Pawar family News : काका-पुतण्या एकत्र यावेत, आशाताई पवारांचं विठूरायाला साकडं | Marathi News

Ashatai Pawar Prays For Family Unity : नवीन वर्षानिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी पवार कुटुंब परत येण्यासाठी प्रार्थना केली असल्याचं सांगितलं आहे.

अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावेत अशी इच्छा असल्याचं आशाताई पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी विठूरायाला हे साकडं घातलं आहे. आज नवीन वर्षानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईने विठ्ठल - रुक्मिणीचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना विठूरायाला घातलेल्या साकड्याबद्दल सांगितलं.

अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतण्या पुन्हा एकदा एकत्र यावेत यासाठी आपण आज विठूरायाला साकडं घातलं, असं आशाताई पवार यांनी सांगितलं आहे. तसंच पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा पवार कुटुंब गुण्यागोविंदाने नांदावं, अशी प्रार्थना केल्याचंही त्यांनी म्हटलं. नवं वर्ष राज्यातल्या सगळ्यांना चांगलं जावं, सुख समृद्धी लाभावी अशीही प्रार्थना मी आज विठूरायाला केली आहे, असंही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com