VIDEO: खोके सरकार जाऊन मविआचे सरकार आले पाहिजे, यशोमती ठाकूर आक्रमक
अमरावतीमध्ये विविध प्रश्नांवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसने मोर्चा काढला होता. शेतकरी, सर्वसामान्य, शेतमजूर, विद्यार्थी, कर्जमाफी, घरकुल हप्ते यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. अमरावतीच्या इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली. 'खोके सरकार जाऊन, महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे.', अशी मागणी त्यांनी केली. तसंच, 'फडणवीस सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. अमरावती जिल्ह्यामध्ये शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याला घरकुलाचा हप्ता मिळाला नाही म्हणून त्यांना आत्महत्या केली आहे.', असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.