Amit Thackeray News | भाजप उमेदवाराचा प्रचार करा, अमित ठाकरेंची कार्यकर्त्यांना सूचना

अमित ठाकरे यांनी पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करा असे आदेश अमित ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे:

गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. अमित ठाकरे यांनी पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करा असे आदेश अमित ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. याच पुण्यातून वसंत मोरे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला राम राम करत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला होता. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. दुसरीकडे याच मतदारसंघातून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणूक लढत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com