Akola : अकोल्यात ST चा अपघात, सुदैवाने २८ शालेय मुलं बचावली | VIDEO

ST Bus Accident Akola : धावत्या बसचा प्रॉपर जॉइंट तुटल्याने बसचं संतुलन बिघडले. बसमध्ये २८ शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने एसटी बस चालकामुळे मोठा अपघात टळला आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट-हिवरखेड मार्गावर धावत्या एसटी बसचा प्रॉपर जॉइंट अचानक तुटल्याची घटना घडली असून, मोठा अपघात टळला आहे. बसमध्ये सुमारे २८ शालेय विद्यार्थी आणि इतर प्रवासी प्रवास करत होते. अकोल्यातील हिवरखेड मार्गे अकोटकडे येत असताना बसचा प्रॉपर जॉइंट तुटल्यामुळे वाहनाचं संतुलन बिघडलं. मात्र, बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. बस थांबवण्यात यश आल्यानंतर विद्यार्थ्यांसह प्रवासी तब्बल दीड तास रस्त्यावर ताटकळत उभे होते. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या देखभाल-दुरुस्ती कामातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजी कारभारावर आता सवाल उपस्थित होत आहेत. प्रवाशांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com