Ajit Pawar News : अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं दगडूशेठला गणपतीला विजयासाठी साकडं

Maharashtra Politics Today News : सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून बारामतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी बाप्पा समोर विजयासाठी साकडं घातलं.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतलं. उमेदवारी (Lok Sabha Election 2024) अर्ज भरण्यापूर्वी दोघांनीही दगडूशेठ गणपती बाप्पा समोर प्रार्थना केली आणि यानंतर आरतीही करण्यात आली. सकाळी लवकर मंदिरात जाऊन अजित पवार यांनी सपत्नीक गणपतीला साकडं घातलं. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून बारामतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी बाप्पा समोर विजयासाठी साकडं घातलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com