Special Report : Ajit Pawar यांची 'नार्को टेस्ट करा', Anjali Damania यांची मागणी

पत्रकार परिषदेत अजित पवार खोटं बोलले असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणीही दमानिया यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया पुणे हिट अंड रन प्रकरणी म्हणाल्या की काल अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांची देहबोली वेगळी होती. पुणे हिट अँड रनवर बोलायला अजित पवार यांना चार दिवस का लागले? काल जे बोलत होते ते अजित पवार खोटं बोलत होते असा मला संशय आहे म्हणून अजित पवार यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे. अजित पवार यांचा फोन जप्त केला पाहिजे असेही दमानिया म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com