Special Report : Ajit Pawar | दादांची गैरहजेरी, काकांची कुरघोडी

Ajit Pawar News Today | बारामतीच्या मतदानानंतर चौथ्या टप्प्यात अजित पवारांनी शिरूर, नगर आणि बीडमधल्या महायुतीच्या सभा चांगल्याच गाजवल्या.उमेदवारांपासून विरोधी आमदारांपर्यंत सर्वांना दम भरला.मात्र अखेरच्या टप्प्यात अजितदादा कुठे गायब झाले असा सर्वांनाच प्रश्न पडला.

बारामतीच्या मतदानानंतर चौथ्या टप्प्यात अजित पवारांनी शिरूर, नगर आणि बीडमधल्या महायुतीच्या सभा चांगल्याच गाजवल्या. उमेदवारांपासून विरोधी आमदारांपर्यंत सर्वांना दम भरला. मात्र अखेरच्या टप्प्यात अजितदादा कुठे गायब झाले असा सर्वांनाच प्रश्न पडला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या मुंबईतल्या रोड शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ उपस्थितच नव्हते. तर रोड शोच्या नियोजनासाठी शिंदे कल्याणमधील मोदींची सभा अर्ध्यावर सोडून गेले. मात्र मोदी रोड शोसाठी आल्यानंतर त्याठिकाणी सर्वांना खटकली ती अजित पवारांची गैरहजेरी..अजितदादा नाराज आहेत की काय अशी जोरदार चर्चा सुरू झालीय. मात्र दादांच्या दांडीवर चक्क शरद पवारांनी खुलासा करत त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com