Sanjay Raut | "त्यांनाच शिंदे नको होते.." राऊतांनी नावं घेत सगळंच सांगितलं..

Sanjay Raut | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कुणाला नको होते? राऊतांनी थेट नावेच सांगितली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको अशी भूमिका घेणारे अजित पवार, सुनिल तटकरे आणि दिलाप वळसे पाटील यांनी घेतली होती. असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचंच नाव पुढे करण्यात आलं होतं . पण, भाजपच्या काही वरीष्ठ नेत्यांनी त्यांचा विरोध केला होता. तेच वरीष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात आहेत. असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com