Ajit Pawar Breaking News : अजितदादांचं ठरलं? उमेदवारांची यादी आली समोर; पहा व्हिडिओ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत विधानसभेसाठी २५ उमेदवारांची नावं ठरवण्यात आली आहे. यात अजित पवार बारमातीमधूनच लढणार असल्याचं ठरल्याचं समजत आहे. त्यामुळे अजितदादांनी आगामी विधानसभेसाठी आपला पहिला डाव टाकल्याचं बोललं जात आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या अंतर्गत बैठकीत २५ उमेदवारांची नावं फायनल करण्यात आली आहेत. त्या उमेदरांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. महायुतीमध्ये जागाटावटपाची चर्चा सुरु आहे. पण त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले २५ उमेदवार ठरवले आहेत. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत अजित पवार बारामतीमधूनच लढणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवारांव्यतिरिक्त उमेदवार बारामतीत नसणार त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.