Ajit Pawar : विसर्जन मिरवणुकीत अजितदादांच मोठं विधान; पहा Video
10 दिवस उल्हासाने पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बाप्पाच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. पुण्याच्या अलका चौकात अजित पवार गणपती विसर्जन मिरावणुकीच्या स्वागतासाठी आले आहे. यावेळी त्यांनी मागच्या वर्षीपेक्षा यंदाचा गणेशोत्सव वेगळा असल्याचं म्हंटल आहे.
पुण्याच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अजितदादांनी देखील हजेरी लावली. त्यानंतर तयांनी माध्यमांशी संवाद साधताना यंदाचा गणेशोत्सव वेगळा आहे, असं म्हंटल. ''यंदा विसर्जन मिरवणुकीत पाऊस नाही. त्यामुळे गणेशभक्तांना पाण्याचा त्रास मिरवणुकीत होणार नाही. शिवाय गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेला गणपती उत्सव निर्विघ्नपणे पार पडला आहे'', असं देखील त्यांनी म्हंटल आहे. यावेळी जागा वाटपासंदर्भात बोलताना, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गोष्टी ठरतील, लवकरच जागा वाटपाबद्दल माहिती देऊ'', असं अजित पवार यांनी म्हंटल आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.