Mumbai 26 July 2005 Rain : मुंबईतील 'त्या' भयानक दिवसाला 20 वर्षे पूर्ण! | VIDEO

Mumbai Floods 2005 : मुंबईतील 26 जुलै 2005 च्या प्रलयंकारी पावसाला आज 20 वर्षे पूर्ण होतायत.या दिवशी मुंबईवर निसर्गानं अक्राळविक्राळ तांडव केलं होतं.

आज २६ जुलै मुंबईसाठी काळा दिवस ठरलेला हा दिवस. २००५ साली याच दिवशी निसर्गाने मुंबईवर प्रलयंकारी तांडव केलं होतं. आज त्या भयावह घटनेला २० वर्षं पूर्ण होत आहेत. अवघ्या २४ तासांत तब्बल ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. जो शंभर वर्षांतील विक्रमी पाऊस ठरला.या आपत्तीत १,००० हून अधिक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शहरातील ३७ हजार रिक्षा, ४ हजार टॅक्सी आणि ९०० बेस्ट बसेस पाण्यात बुडाल्या. हजारो घरांचं नुकसान झालं, तर कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान शहराने सोसलं होते. संपूर्ण मुंबई अक्षरशः ठप्प झाली होती. रस्ते, रेल्वे, विमानतळ सर्व काही बंद पडलं होतं आणि नागरिकांच्या मनात कायमची एक भीती निर्माण झाली.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. २६ जुलैची आठवण आजही मुंबईकरांच्या मनात धसका देणारी ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com