Tahawwur Rana: २६/११ बॉम्ब स्फोटमधील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणणार| VIDEO

Tahawwur Rana in India: २६/११ बॉम्ब स्फोटमधील दोषी आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार आहे.

२६/११ चा हल्ला आठवला तरीही अंगावर काटा येतो. या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणलं जाणार आहे. राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातल्या अनेक टीम अमेरिकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याला लवकरच भारतात आणलं जाईल, असं सांगितलं आहे.

तहव्वूर राणाला आज किंवा उद्या भारतात आणण्याची शक्यता आहे. अमेरिकेतली कोर्टाच्या सुचनेनुसार, तहव्वूर राणासाठी दिल्ली आणि मुंबईच्या तुरुंगात तयारी करण्यात आली आहे. त्याला सुरुवातीचे काही आठवडे एनआयएच्या कस्टडीमध्ये ठंवलं जाईल.

तहव्वूर राणाची यापूर्वीची याचिका फेटाळली होती. यामध्ये प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोषी तहव्वूर राणा याने प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. माझ्यावर भारतात अत्याचार केला जाईल, असं त्याने अमेरिकेतली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com