
सातारा : जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या Lock Down नियमांना हरताळ फासत महाबळेश्वर पाचगणी Mahabaleshwar Panchgani येथे पर्यटकांची Tourists वर्दळ वाढताना आता दिसू लागली आहे. मॅप्रो गार्डन मध्ये खरेदी साठी पर्यटकांची झुंबड उडाल्याचे व्हीडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. Tourists flouting lock Down rules in Mahabaleshwar
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते परिणामी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आणि रुग्णांचा मृत्युदर या दोन्ही च्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली होती म्हणूनच जिल्हाप्रशासनाने कडक लॉक डाऊन करत या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला होता.जवळ जवळ 20 दिवसांपेक्षा ही जास्त लॉक डाऊन केल्यावर प्रशासनाने अल्प प्रमाणात लॉक डाऊन शिथिल केला.
हे देखिल पहा
अत्यावश्यक सेवा काही ठराविक वेळेत सुरू ठेवण्यास मुभा दिली होती आणि शनिवार,रविवार कडक लॉक डाऊन जाहीर केला होता परंतु प्रशासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवत आता शनिवार, रविवार महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पाचगणी मधील मॅप्रो तर राजरोस पणे सुरू असल्याचे काही व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Tourists flouting lock Down rules in Mahabaleshwar
सध्या जिल्ह्या हा कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत असताना पाचगणी,महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळांवर होणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच प्रशासनाने येथे येणाऱ्या पर्यटकांवर आणि लॉक डाऊन मध्ये प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवनाऱ्या व्यवसायिकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.नाहीतर पुन्हा बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांमुळे सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे आता प्रशासन या व्यावसायिकांच्या बाबत कठोर भूमिका घेणार का, हे पाहावे लागेल.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.