कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात 513 डॉक्टरांचा मृत्यू; दिल्लीत सर्वाधिक डॉक्टरांनी गमावले प्राण  

covid 19 doctors.jpg
covid 19 doctors.jpg

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणू Corona Virus संसर्गामुळे होणा-या नवीन रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशातच कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा Doctors कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक बातम्या आपण पहिल्या आहेत. (The second wave of corona killed 513 doctors across the country; Most doctors lost their lives in Delhi) 

ही देखील पहा- 

मात्र देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 513 डॉक्टरांनी आपले प्राण गामावल्याची माहिती समोर आली आहे.  इंडियन मेडिकल असोसिएशनने Indian Medical Association  याबाबत नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या तब्बल 513 डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनने  प्रसिद्ध केलेल्या आपल्या आकडेवारीत, राजधानी दिल्लीत सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यु झाला आहे. दिल्लीत दुसऱ्या लाटेत 103 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. त्याखालोखाल बिहारमध्ये 96 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशात 41, राजस्थानात 39, आंध्रप्रदेश आणि झारखंडमध्ये 29-29, तर महाराष्ट्रात 15 डॉक्टर्स मरण पावले आहेत.

दरम्यान, मंगळवारी (25 मे)  देशभरात सुमारे 40 दिवसांनंतर कोरोनाचे 2 लाखाहूनही कमी नवीन रुग्ण आढळले होते, तर आज (बुधवार, 26 मे) पुन्हा नवीन प्रकरणे आणि मृत्यूची संख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 2 लाखाहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 4100  हून अधिक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तथापि,  या कालावधीत, रुग्णांमधील बरे होण्याचे प्रमाण हे नवीन प्रकरणांच्या तुलनेत वाढले आहेत. गेल्या एका दिवसात देशात 2.95 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर भारतातील कोरोनामधील सक्रिय प्रकरणांची संख्या आता 25  लाखाहून कमी आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com