देर है मगर अंधेर नहीं! अखेर निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवलं

nirbhaya
nirbhaya
Published On

नवी दिल्ली -  निर्भयाच्या दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आलं आहे. संपूर्ण देशाला ज्या घटनेने हादरवून सोडलं होतं, त्या निर्भया सामूहित बलात्कार आणि हत्याकांडातील चार आरोपींना अखेर फासावर लटकवण्यात आलं आहे. पहाटे या चारही आरोपींना फाशी देण्यात आली. तिहार तुरुंगात या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावरणी करण्यात आली. त्यामुळे उशिरा का होईला निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जात आहे. याआधी दोषींच्या फाशीला विलंब होत असल्यानं निर्भयाच्या आईने वेळोवेळी संताप व्यक्त केला होता. अखेर या चारही नराधमांना फाशी शिक्षा देण्यात आली आहे.

मृत्यू समोर दिसताच पुन्हा कोर्टाकडे धावाधाव

दरम्यान फाशीच्या शिक्षेआधीही या दोषींनी आपली फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला होता. गुरुवारी रात्री उशिरा निर्भयाच्याा दोषींनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आणि एक याचिका दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती संजय नरुला यांच्या खंडपिठासमोर या याचिकेची सुनावणी करण्यात आली. 

यावेळी दिल्ली हायकोर्टानं दोषींच्या वकिलांना चांगलंच सुनावलं. एकाच दिवशी तिन्ही न्यायालयांसमोर गेलेल्या वकिलांना यावेळी गोष्टी हाताबाहेर गेल्याचा युक्तिवाद करता येणार नाही, असं म्हणत हायकोर्टानं फटकारलं. 

फाशीआधी झालेला पुन्हा फाशी टाळण्याचा प्रयत्न

मात्र सगळे पर्याय संपल्यानंतरही दोषीच्या वकिलांची फाशी टाळण्यासाठीचे प्रयत्न सुरुच होते. दरम्यान, तिहार तुरुंगात दोषींना फाशी देण्यासाठी पवन नावाच्या जल्लादाला पाचारण करण्यात आले होतं. त्याला प्रत्येक फाशीसाठी १५ हजार रुपये मिळणार आहेत. तिहारच्या तुरुंग क्रमांक ३ मध्ये फासावर चढविण्याची रंगीत तालीमदेखील घेण्यात आलेली होती. फाशीसाठी वापरले जाणारे दोर बिहारच्या बक्सरमधून मागवण्यात आले होते..

याआधी दोषींनी २२ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी दोषींना फासावर चढविण्याचे निर्णय स्थगित करुन फाशीला विलंब करण्यात आला होता. त्यामुळे एकूणच नाराजीचा सूर उमटला होता. मात्र अखेर 5 मार्च रोजी चौथा मृत्यू वॉरंट काढलं होतं. या वॉरंटमध्ये 20 मार्च रोजी दोषींना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश देण्यात आले होते.  या आदेशाप्रमाणे अखेर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 

१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीच्या वसंत विहार भागात तरूणीवर पाशवी बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अतिशय वाईट परिस्थितीत तिने झुंज दिली व तिचा मृत्यू झाला. 

पाहा व्हिडीओ - 

Nirbhaya Case rape four convicts finally haned in tihar jail marathi histortic history marathi rape no mercy justice 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com