निलंबनाची कारवाई केली म्हणून थेट शाळेचा डेटा चोरला

Cyber Attack
Cyber Attack
Published On

मुंबई : महिला कर्मचा-याचा विनयभंग Molestation केल्याप्रकरणी कामावर काढून टाकल्याचा राग धरून परळ Parel येथील आंतरराष्ट्रीय शाळेतील School कर्मचा-याने थेट शाळेतील गोपनीय माहिती उघड करण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी Ransom मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. Mumbai School Employee Stole data after Suspension

याप्रकरणी शाळेच्या मुख्य वित्तीय अधिका-याने भोईवाडा पोलिसांकडे Police तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी खंडणी व माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याप्रकरणी आरोपी कर्मचा-याविरोधात गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे.

हे देखिल पहा

आरोपी गेल्या 9 वर्षांपासून शाळेत मुख्य लेखापाल म्हणून काम करत होता. 25 मेला आरोपी लेखापालाने महिला सहकर्मचा-याचा विनयभंग केला. त्याबाबत महिला कर्मचा-याने शाळेच्या ट्रस्टकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोपी कर्मचा-याला निलंबीत करण्यात आले व त्याच्याविरोधात विशेष समिती स्थापन करून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या समितीच्या चौकशीत आरोपी लेखापालाला दोषी ठरवण्यात आले. Mumbai School Employee Stole data after Suspension

त्याचा राग धरून आरोपीने 8 जूनला तक्रारदार आरोपीने व्हॉट्सअॅप संदेश केला. त्यात त्याच्याविरोधातील सर्व आरोप रद्द करावे अन्यथा शाळेचा महत्त्वाचा डाटा वायरल करण्यात येईल. त्यावेळी आरोपींनी संबंधी डाटाही ईमेलद्वारे पाठवला होता. आरोपी शाळेत वरिष्ठ लेखापाल असल्यामुळे त्याला हा डेटा पाहण्याचे अधिकार होते.

पण तो घेऊन घरी जाण्याचे अथवा साठवण्याचे, लीक करण्याचे अधिकार नाहीत. तक्रारदार यांनी याबाबतची ट्रस्टला माहिती दिली. त्यानंतर बुधवारी आरोपीने पुन्हा शाळेच्या एका ट्रस्टीला दूरध्वनी करून 20 लाख रुपये दिले नाही, तर शाळेचा गोपनीय डेटा लीक करण्याची धमकी दिली. Mumbai School Employee Stole data after Suspension

प्रकणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळेच्या ट्रस्टने याप्रकरणी पोलिसांना तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारी तक्रारदार यांनी आरोपीचे संदेश व संभाषणाचे रेकॉर्डींनी पोलिसांना सादर केले. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय विनयभंग करण्यात आलेल्या महिला कर्मचा-याच्या तक्रारीवरून या लेखापालाविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार भोईवाडा आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com