बुलढाण्यात आढळला 'ह्या' रंगाचा कावळा

buldhana
buldhana

बुलढाणा  : कुणालाही विचारलं की पाखरांच्या जातातील काळ्याकुट्ट रंगांचा पक्षी कोणता तर पहिलं नाव येत ते म्हणजे कावळ्याच आणि तुम्हाला कुणी सांगितलं की पांढऱ्या रंगाचा कावळा तुम्ही कधी पाहिला का तर तुम्ही म्हणाल पांढऱ्या रंगाचा कुठं कावळा असतो का ? A crow of this color was found in Buldhana

तर असतो, हो असाच एक पांढऱ्या White रंगाचा कावळा Crow  सध्या बुलडाण्याच्या Buldhana खामगाव Khamgaon तालुक्यातील बोरीअडगाव परिसरात वावरतो आहे. या भागात आढळलेल्या पांढऱ्या कावळ्याने गेल्या काही दिवसांपासून लक्ष वेधून घेतले असून या कुतूहलाची जोरदार चर्चा रंगली आहे.

बोरी अडगावात झाडांवर शुभ्र कबुतरासारखा पांढरा कावळा दिसून आला आहे. येथील शिवाजीराव पाटील यांच्या घराजवळ येणाऱ्या पाखरांमध्ये पाटील यांना एक वेगळाच पक्षी असल्याचे आढळले.A crow of this color was found in Buldhana

कुतूहल म्हणून त्यांनी निरीक्षण केले, तेव्हा त्या पक्ष्याची ठेवण चोच आणि डोळे हे नेहमीच्या कावळ्या सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा आवाज ऐकल्यावर तो कावळाच असल्याची खात्री त्यांना पटली.

यांनी ही बाब शेजारच्यांना सांगितली व त्यांनी छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली थोड्याच वेळात हे  कुतूहल संपूर्ण परिसरात पसरले. अशा प्रकारचा कावळा क्वचितच आढळतो. A crow of this color was found in Buldhana

पांढरा कावळा ही कोणतीही नवीन प्रजाती नसून अनुवंशिक स्थितीमुळे होणारे एक उत्परिवर्तन आहे. पक्षी प्राण्यांच्या शरीराचे रंग विशिष्ट द्रव्यांमुळे ठरतात. ही रंगद्रव्ये मेलानिन, कॅरेटीनोईड आणि पॉरफिरीनसया प्रकारची असतात.

हे देखील पहा -

या तीनही रंगद्रव्यांची कमी-जास्त असू शकतात किंवा पूर्णपणे कमतरता पक्ष्यांची रंगसंगती ठरवते किंवा बिघडवू शकते. या पैकी मेलानिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे पिसे पूर्ण पांढऱ्या रंगाची होतात. कावळ्याबाबत असे झाले असावे, असे पक्षीमित्र राहुल सुरवाडे यांनी सांगितले. A crow of this color was found in Buldhana

Edited By : Krushnarav Sathe 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com