Yuzvendra Chahal takes Shikhar Dhawan's English class
Yuzvendra Chahal takes Shikhar Dhawan's English classTwitter

Yuzvendra Chahal ने घेतला Shikhar Dhawan चा इंग्लिश क्लास, व्हिडिओ पाहून थांबणार नाही हसू

Yuzvendra Chahal Video: शिखरने नेमका काय प्रश्न विचारला आणि त्याला चहलने काय उत्तर दिलं हे तुम्ही व्हिडिओतच पाहा.
Published on

Shikhar Dhawan Video: टीम इंडियाचे काही क्रिकेटर्स त्यांच्या खेळासोबतच सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओंसाठीही चर्चेत असतात. शिखर धवन आणि युझवेंद्र चहल हे दोघे त्यांच्या इन्स्टा रीलमुळे अनेकदा ट्रेंड होतात. आता या दोघांचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने शेअर केला आहे. या व्हिडिओतील दोघांचे इंग्रजी पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

धवन आणि चहल हे दोघेही अतिसय मस्तिखोर स्वभावाचे क्रिकेटर आहेत. त्यांच्या व्हिडिओंची सोसल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फोलोविंग आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही त्यांच्या सेन्स ऑफ ह्यूमरचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

Yuzvendra Chahal takes Shikhar Dhawan's English class
Sharad Pawar Exclusive: अशी झाली राजकारणात एन्ट्री; खुद्द शरद पवारांनी सांगितला किस्सा...

शिखरच्या गमतीशीर प्रश्नांना चहलचे भन्नाट उत्तर

शिखर धवन युझवेंद्र चहलला पंजाबीमध्ये विचारतो की मुलीला इंग्रजीत काय म्हणतात? प्रत्युत्तरात युजी म्हणतो शी. मग शिखर विचारतो मुलाला काय म्हणतात युजी म्हणतो ही. त्यानंतर शिखरचा प्रश्न आणि युजीचं उत्तर ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही.

शिखरने नेमका काय प्रश्न विचारला आणि त्याला चहलने काय उत्तर दिलं हे तुम्ही व्हिडिओतच पाहा. या व्हिडिओत उमरान मलिकही दोघांसोबत मस्ती करताना दिसत आहे. (Latest Sports News)

Yuzvendra Chahal takes Shikhar Dhawan's English class
Chandrashekhar Bawankule: 'मला वाटतं त्यांनी..'; बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक सल्ला; कसबा निकालावरून साधला निशाणा

चहलचं वनडे मालिकेत पुनरागमन!

शिखर धवनच्या मैदानात पुनरागमनाबद्दल बोलायचे झाले तर आता तो टीम इंडियात परतणे थोडे कठीण आहे. कारण शुभमन गिल आणि इशान किशन हे दोघेही उत्तम पर्याय आहेत. दुसरीकडे चहलचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. आता प्लेइंग 11 मध्ये त्याचा समावेश होतो की नाही हे पाहावे लागेल.

दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. चहलने गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. शिखर धवन यंदा पंजाब किंग्जचे कर्णधारपद भूषवणार आहे. (Viral Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com