CSK vs GT Final, Viral Video: एकच फाईट अन् वातावरण टाईट!भर पावसात महिलेनं पोलिसाला मारली कानाखाली; कारण काय? - VIDEO

Women Slapped Police Cops During Match: या सामन्यात आश्चर्यकारक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
viral video
viral videosaam tv

CSK VS GT, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार होता. मात्र अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे हा सामना होऊ शकला नाही. पाऊस ११ वाजता थांबला मात्र, मैदान तयार करण्यासाठी १ तास लागणार होता.

त्यामुळे खेळाडू, प्रशिक्षक आणि सामना अधिकाऱ्यांनी मिळून हा सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात आश्चर्यकारक घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

viral video
CSK vs GT Live Score, IPL 2023 Final: पावसानं निकाल लावलाच! चेन्नई-गुजरात फायनलबाबत आली मोठी आणि महत्वाची अपडेट

गेल्या काही दिवसांपासून अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. मात्र पावसामुळे हा सामना धुतला गेला आहे. आता रिझर्व्ह डेच्या दिवशी सामन्याचा निकाल लागणार आहे. अहमदाबादमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली.

असे असताना देखील प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी तुफान गर्दी केली होती. दरम्यान एका महिलेनं पोलिस अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची घटना घडली आहे.

कारण अस्पष्ट..

तर झाले असे की, प्रेक्षकांची काळजी घेण्यासाठी एक पोलिस अधिकारी तिथे तैनात करण्यात आला होता. तो त्या महीलेजवळ जातो आणि अचानक ती महिला त्याला मारायला सुरुवात करते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच, महिलेला जाब विचारायला सुरुवात झाली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, ती महिला त्या पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करताना दिसून येत आहे. मात्र नेमकं कारण काय आहे, हे अजुनही अस्पष्ट आहे. (Latest sports updates)

सोमवारी लागणार सामन्याचा निकाल..

रविवारी पाऊस पडल्यामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे आता सोमवारी या सामन्याचा निकाल लागणार आहे. सलग दुसऱ्यांदा अंती फेरीत प्रवेश करणारा गुजरात टायटन्स संघ दुसरे जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दहाव्यांदा अंतिम फेरीत जाणारा चेन्नईचा संघ पाचवे जेतेपद मिळवण्याचा प्रयत्नात असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com