WPLच्या पहिल्याच दिवशी वाद, गुजरातने आपल्या प्लेअरला हटवलं; काय आहे प्रकरण?

Cricket News : डायंड्रा डॉटिन फिट नसल्याने ती स्पर्धेत खेळू शकत नाही, असं गुजरात जायंट्सने सांगितलं.
WPLच्या पहिल्याच दिवशी वाद, गुजरातने आपल्या प्लेअरला हटवलं; काय आहे प्रकरण?

WPL 2023 : वुमन्स प्रीमियर लीग (WPL) सुरू झाली असून पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पराभव करत स्पर्धेची शानदार सुरुवात केली. पण हंगामाच्या सुरुवातीलाच एक वाद समोर आला आहे. याबाबत गुजरात जायंट्सने एक निवेदन जारी केले आहे.

वेस्ट इंडिजची खेळाडू डिआंड्रा डॉटिन महिला प्रीमियर लीगचा भाग बनू शकली नाही. तिला गुजरात जायंट्सने ६० लाख रुपयांना विकत घेतले होते, पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघाने तिच्या जागी दुसऱ्या खेळाडूला स्थान दिले. डायंड्रा डॉटिन फिट नसल्याने ती स्पर्धेत खेळू शकत नाही, असं गुजरात जायंट्सने सांगितलं. (Latest sports updates)

WPLच्या पहिल्याच दिवशी वाद, गुजरातने आपल्या प्लेअरला हटवलं; काय आहे प्रकरण?
Udhav Thackeray: सभेची जय्यत तयारी! गोळीबार मैदानात ठाकरी तोफ धडाडणार; टीझरही प्रदर्शित

मात्र, डिआंड्राने संघाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत ती पूर्णपणे फिट असल्याचे सांगितले डायंड्रा डॉटिनने ट्विट करत म्हटलं की, मला आलेल्या मेसेजबद्दल मी तुमची आभारी आहे, पण सत्य काही वेगळेच आहे. (Cricket News)

गुजरात जायंट्सने एक निवेदन जारी केले आहे आणि त्यांनी म्हटले आहे की डिआंड्रा डॉटिन एक महान खेळाडू आहे आणि संघासाठी खूप महत्वाची आहे. परंतु आम्हाला निर्धारित वेळेपूर्वी वैद्यकीय मंजुरी मिळाली नाही, जी WPLमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे की ती येत्या हंगामात आमच्यासोबत असेल.

WPLच्या पहिल्याच दिवशी वाद, गुजरातने आपल्या प्लेअरला हटवलं; काय आहे प्रकरण?
Virat Kohli: 'लोकं म्हणतात तू विराटचं इतकं कौतुक का करतो..?' पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने दिलं मन जिंकणारं उत्तर

गुजरात जायंट्ससाठी मोसमाची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्सने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला, या सामन्यात मुंबईने 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सचा डाव अवघ्या 64 धावांत आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com