ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने (Aaron Finch) दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकत त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 (WI vs AUS Second T-20) सामना रविवारी सकाळी डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रोस इस्लेट, सेंट लुसिया येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियासमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकांत 140 धावांत आटोपला. वेस्ट इंडीजने पहिला टी-20 18 धावांनी जिंकली होती.
हेटमायरने 36 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या तर डीजे ब्राव्होने 34 चेंडूत १ चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा फटकावल्या. त्याचवेळी आंद्रे रसेलने 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 8 चेंडूत 24 धावांची तुफानी पारी खेळली.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकांत 140 धावांत गुंडाळला गेला आणि ऑस्ट्रलिया सामना 56 धावांच्या फरकाने हरला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शने सर्वाधिक 54 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त जोश फिलिपीने 13 आणि मोईसेस हेनरिक्सने 19 धावा केल्या. याशिवाय कोणताही फलंदाज दुहेरी आकडादेखील ओलांडू शकला नाही. हेडन वॉल्श जूनियरने कॅरेबियन संघाकडून तीन गडी बाद केले.
दरम्यान, नुकतीच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात पाच सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली. या मालिकेत कॅरेबियन संघाला 3-2 अश्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर टी -20 तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला की टी-२० स्पेशालिस्ट खेळाडू असलेल्या संघाला मालिका जिंकता आली नाही.
एका सामन्यात संघाला एका धावांने पराभव पत्करावा लागला होता. परंतु, वेस्ट इंडीज संघ ऑस्ट्रेलियाच्या संघाविरूद्ध बलाढ्य दिसत आहे आणि पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात कॅरेबियन संघाने कांगारू संघाला पायदळी तुडवले आहे. वेस्ट इंडीजने दुसर्या टी -२० सामना मोठ्या फरकाने सामना जिंकला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.