धोनीमुळे निवृत्त होणार होतो पण... 'या' सिनियरने मला अडवले; वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा निवृत्तीबाबतचा विषय चर्चेमध्ये आणला आहे.
Verendra Sewag News, Cricket News Updates, Team India News in Marathi
Verendra Sewag News, Cricket News Updates, Team India News in MarathiSaam Tv

भारतीय क्रिकेट संघाचा माजी ओपणर वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा निवृत्तीबाबतचा विषय चर्चेमध्ये आणला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली पण, धोनीने कर्णधार म्हणून अनेक मोठ्या स्पर्धा जिंकल्या आणि टीम इंडियाला यश मिळवून दिले. अनेकवेळा त्याच्यावर वरिष्ठ खेळाडूंना संघातून बाहेर काढल्याचा आरोपही झाला होता. जवळपास 10 वर्षांनंतर, वीरेंद्र सेहवागने देखील आपल्या मनातील दुःखद आठवण सांगितली आणि धोनीला एका वेळी निवृत्ती कशी घ्यावी लागली हे सांगितले. (Team India News in Marathi)

सेहवाग म्हणाला की, 2008 मध्ये जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात होतो, तेव्हा माझ्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मी कसोटी मालिकेत पुनरागमन केले आणि 150 धावा केल्या होत्या. वन डे च्या तीन-चार सामन्यांमध्ये मला धावा करता आल्या नाहीत आणि त्यामुळे मला महेंद्रसिंग धोनीने प्लेइंग इलेव्हनमधून वगळले, मग माझ्या मनात वन डे क्रिकेट सोडण्याचा विचार आला. त्यावेळी मला वाटले आता फक्त कसोटी क्रिकेटमध्ये आपण खेळायचे.

Verendra Sewag News, Cricket News Updates, Team India News in Marathi
सात बालकांवर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार; धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

पुढे कसोटी संघातून वगळल्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटकडे कसा वळला हे त्याने स्वतः सांगितले. पण इथेही त्याच्या बॅट मधुन त्याला धावा मिळाल्या नाहीत, पुढे मेहनतीच्या जोरावर सेहवाग टीम इंडियात परतला आणि वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमचा एक भाग झाला.

हे देखील पाहा-

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर सचिननेच त्याला वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यापासून रोखले होते, असा खुलासाही सेहवागने त्यावेळी केला होता. सेहवाग म्हणाला की, सचिन तेंडुलकरने त्यावेळी मला थांबवले होते. सचिनने मला सांगितले की, हा तुझ्या आयुष्यातील एक वाईट टप्पा आहे. जरा थांबा, दौऱ्यानंतर घरी जा, नीट विचार कर आणि मग निर्णय घे की तुला पुढे तूझ्या कडून काय हवे आहे, मग ते कर. तेव्हा मी माझ्या निवृत्तीची घोषणा केली नाही ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com