Virat Kohli Latest News: विराट कोहलीच्या Video मुळे पेटला वाद!प्रकरण थेट न्यायालयात;नेमकं काय घडलं?

Virat Kohli News In Marathi: विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल होताच प्रकरण थेट न्यायालयात गेलं आहे.
 virat kohli speaks on lack of playgrounds uttarakhand hc issued notice to state and centre goverment|
virat kohli speaks on lack of playgrounds uttarakhand hc issued notice to state and centre goverment|Saam Tv
Published On

Virat Kohli Latest News:

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये विराट कोहली स्टेडियमबाबत भाष्य करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रकरण आता थेट न्यायालयात पोहोचलं आहे.

उत्तराखंड न्यायालयाने या प्रकरणात दखल देत केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.

 virat kohli speaks on lack of playgrounds uttarakhand hc issued notice to state and centre goverment|
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून टीम इंडियाचे २ हुकमी एक्के पडणार बाहेर? मोठी माहिती आली समोर

काय आहे विराटच्या व्हिडिओमध्ये..

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, विराट कोहली स्टेडियमच्या दुरावस्थेबद्दल चर्चा करताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस मैदानांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना आणि लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानं नाही.

मैदानं नसल्याने लहान मुलांना गल्लीत खेळावं लागतं. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड न्यायालयाने येत्या २ आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.

मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती राकेश थापलियाल यांच्या खंडपीठाने उत्तराखंडचे क्रीडा सचिव,भारत सरकारचे नगर विकास सचिव आणि युवा व्यवहार आणि क्रीडा सचिव नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची सुनवाई येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Latest sports updates)

 virat kohli speaks on lack of playgrounds uttarakhand hc issued notice to state and centre goverment|
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेतून टीम इंडियाचे २ हुकमी एक्के पडणार बाहेर? मोठी माहिती आली समोर

विराटच्या व्हिडिओवर न्यायालयातं म्हणणं काय?

या प्रकरणवर बोलताना न्यायालयाने म्हटले की,' शारीरिकरित्या सक्रिय राहिल्याने मानसिक विकास वेगाने होतो. मात्र ज्यावेळी त्यांना फिट राहण्यासाठीच्या सोयीसुविधा मिळत नाहीत त्यावेळी ते आपला वेळ मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये वाया घालवतात.

हेच कारण आहे की, त्यांचा शारिरीक आणि मानसिक विकास होण्यास उशीर होतो. मैदान असणं हे अतिशय महत्वाचं आहे, असं न्यायालयाचं स्पष्ट मत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com