Virat Kohli Dance: विराट भाऊंचा नादच खुळा! Live सामन्यात' लुंगी डान्स'वर थिरकले पाय -VIDEO

Virat Kohli Lungi Dance Video: सामना सुरू असताना विराट कोहली लुंगी डान्स गाण्यावर डान्स करताना दिसून आला आहे.
Virat Kohli Lungi Dance Video
Virat Kohli Lungi Dance Videotwitter

Virat Kohli Lungi Dance Video:

कोलंबोच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भारतीय संघाने या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी २१४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला १७२ धावा करता आल्या.

यासह भारतीय संघाने या सामन्यात ४१ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली प्रचंड चर्चेत राहिला. त्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Virat Kohli Lungi Dance Video
IND vs SL, Asia Cup 2023: टीम इंडियावर पहिल्यांदाच ओढवली ही नामुष्की; सामना जिंकला मात्र या नकोशा विक्रमाची झाली नोंद

विराटचा डान्स व्हिडिओ व्हायरल..

विराट कोहली फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी करून क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. तर क्षेत्ररक्षण करत असताना देखील त्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अनेकदा तो क्षेत्ररक्षण करत असताना डान्स करताना दिसून आला आहे.

यावेळी कोलंबच्या प्रेमदासा स्टेडियमवर विराट कोहली लुंगी डान्सवर थिरकताना दिसला आहे. त्याचा लुंगी डान्सवर डान्स केल्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

नेपाळी गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल..

यापूर्वी देखील विराट कोहलीच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.आशिया चषकातील साखळी फेरीतील सामन्यात भारत आणि नेपाळ हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात नेपाळची फलंदाजी सुरू असताना स्टेडियममध्ये नेपाळी गाणं वाजताच विराटला डान्सचा मोह आवरला नव्हता. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. (Latest sports updates)

पाकिस्तानविरूद्ध झळकावलं शतक..

पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने तुफानी खेळी करत शतक झळकावले आहे. या सामन्यात त्याने ९४ चेंडूंचा सामना करत १२२ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि ३ षटकार खेचले. त्याला साथ देत केएल राहुलने १११ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com