Virat Kohli Birthday: विराट कोहलीला 13 नोव्हेंबरला पुन्हा कापायचेय केक, जाणून घ्या त्यामागचं कारण

पुन्हा एकदा मेलबर्नमध्ये मोठा केक कापण्याची विराट कोहलीची इच्छा आहे, कारण...
Virat Kohli
Virat Kohli Saam Tv

virat Kohli Birthday News: भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीनं त्याचा 34 वा वाढदिवस ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्गनच्या मैदानात धुमधडाक्यात साजरा केला.कोहलीनं टीम इंडिया आणि पत्रकारांच्या उपस्थितीत केक कापला.स दरम्यान,कोहलीची 13 नोव्हेंबरला पुन्हा एकदा मेलबर्नमध्ये मोठा केक कापण्याची इच्छा आहे. यामागचं कारण जाणून घ्या. (virat kohli birthday celebration in melbourne cricket ground)

विराट कोहलीनं त्याचा वाढदिवस आज शनिवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय मीडियासोबत साजरा केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यानं एक इच्छा व्यक्त केली. भारतासाठी टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर 13 नोव्हेंबरला यापेक्षाही मोठा केक कापायची इच्छा आहे. यावेळी कोहली एमसीजी गॅलरीमधून जात असताना अनेक चाहत्यांना त्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.

Virat Kohli
T20 World Cup: अखेर इंग्लंड सेमिफायनलमध्ये, श्रीलंका पराभूत; ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट

माध्यमांशी संवाद साधताना विराटला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, 'तू कधी सार्वजनीक पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहेस का विराट?' या प्रश्नाचं उत्तर देताना कोहली हसत म्हणाला, तुम्ही लोकांनी याआधी मला केक पाठवला नाही. मी कोणत्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही.एमसीजी मध्ये केक कापणं चागलं आहे, पण मी अजून एक केके कापणं पसंत करेल. 13 नोव्हेंबरला भारतासाठी वर्ल्डकप जिंकून केक कापायची माझी इच्छा आहे.

Virat Kohli
King Kohli Birthday : क्रिकेटच्या किंग कोहलीचे ३४ 'विराट' विक्रम, जाणून घ्या...

भारताची नेट प्रक्टिस संपली होती आणि कोहलीनं अर्धा तास फलंदाजीचे धडे गिरवले. त्यानं नेट गोलंदाजांशिवाय हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सराव केला.रवीचंद्रन आश्विननं मीडियाशी बोलताना सांगितलं की, रिषभ पंतने केक आणला होता. आम्ही सरावा करण्याआधी विराटच्या वाढदिवसानिमित्त ड्रेसिंग रुममध्ये केक कापला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com