Virat Kohli Captain: किंग कोहली पुन्हा एकदा बनला RCB चा कर्णधार

Virat Kohli RCB Captain: विराट कोहलीची पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
Virat Kohli Captain: किंग कोहली पुन्हा एकदा बनला RCB चा कर्णधार
Published On

PBKS VS RCB: पंजाबच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान विराट कोहलीची पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. (Virat kohli captain of rcb)

Virat Kohli Captain: किंग कोहली पुन्हा एकदा बनला RCB चा कर्णधार
PBKS VS RCB IPL 2023: RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का! एक हाती सामना फिरवणारा फलंदाज होऊ शकतो बाहेर

काय आहे कारण?

पंजाब किंग्ज आणि रॉयव चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नाणेफेक सुरु असताना विराट कोहली नाणेफेक करण्यासाठी आला होता. या सामन्यात फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये. तर त्याच्या ऐवजी पुन्हा एकदा विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे.

विराट कोहलीने गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यावेळेची फाफ डू प्लेसिसची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. या सामन्यात फाफ डू प्लेसिस दुखापतग्रस्त असल्याने विराट कोहलीकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र फाफ डू प्लेसिस इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. (Latest sports updates)

Virat Kohli Captain: किंग कोहली पुन्हा एकदा बनला RCB चा कर्णधार
MS Dhoni Ban In IPL? : CSK च्या फॅन्सला मोठा धक्का! IPL मध्ये धोनीवर बंदी येणार? वाचा काय आहे कारण

विराट कोहली नाणेफेक करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने म्हटले की, 'मागच्या सामन्यात फाफ डू प्लेसिसला दुखापत झाली होती. त्यामुळे तो क्षेत्रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार नाहीये. तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरणार आहे. तो विशाकच्या जागी खेळेल.'

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11:

पंजाब किंग्ज:

अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com