विरारच्या आयर्न मॅनची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

सदराची ही स्पर्धा पूर्ण करून हार्दिक यांनी एक नवा विक्रम नोंदविला आहे.
विरारच्या आयर्न मॅनची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
विरारच्या आयर्न मॅनची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद Saam TV

विरारचा भूमिपुत्र असलेल्या आयर्न मॅन हार्दिक पाटीलने नवा कीर्तिमान रोवत भारत तसेच वसईच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला आहे. जगारिक पातळीवर अतिशय खडतर असलेल्या आयर्न मॅन या स्पर्धेत १२ वेळा यश मिळविणारा तो प्रथम भारतीय ठरला आहे. हार्दिकच्या या यशाने संपूर्ण भारतातून त्याचे कौतुक केले जात आहे.

नुकतेच हार्दिकने मेक्सिकोत पार पडलेली १२ वी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करत एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. हार्दिक पाटील याने वर्षात सहा पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा, आणि १६ वेळा अर्ध आयर्न मॅन स्पर्धा तसेच दोन आठवड्यात दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये दोन पुर्ण आयर्नमन स्पर्धा पूर्ण केल्याचा कीर्तिमान मिळविला आहे. त्याच बरोबर हार्दिकने वर्ल्ड मॅरेथॉन मेजर सिरीजमध्ये जगभरात सहा ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवला हे कीर्तिमान गिरवणारा तो एकमेव भारतीय असून त्यांनी एकुण चार विक्रम आपल्या खात्यात जमा केले आहेत. सदराची ही स्पर्धा पूर्ण करून हार्दिक यांनी एक नवा विक्रम नोंदविला आहे.

विरारच्या आयर्न मॅनची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
नाना पटोलेंनी आपल्याच मंत्र्याला आणले अडचणीत; फडणावीसांना दिला पाठींबा

हार्दिकने चार वेळा २०१९ इवेन्ट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये आपल्या नावाचा डंका गाजवला आहे. विविध बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ११ वेळा नोंद करणारा तो एकमेव भारतीय असून सध्या तरुणांसाठी तो मोठा आदर्श ठरत आहे.

हार्दिक मुळात या खेळाच्या पार्श्वभूमीतून नव्हता. पण केवळ जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने आज वसईचे नाव जगाच्या नकाशावर कीर्तिवंत केले आहे. हर्दिकने आयर्न मॅन या स्पर्धेसाठी तरुणांसाठी मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुरु करण्याचा मानस ठेवला आहे. लवकरच तालुक्यातून अनेक मुलांना तो याचे धडे देणार आहे. सध्या हार्दिकच्या कौतुकाचे सर्व स्थरातून चौघडे वाजत आहेत.

काय असते आयर्न मॅन स्पर्धा

फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात ४ किमी पोहणे, १८०.२ किमी सायकल चालवणे आणि ४२.२ किमी धावणे यांचा समावेश असतो.या तिन्ही शर्यती क्रमाने आणि विश्रांतीशिवाय १७ तासाच्या कालावधीत पूर्ण करायच्या असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com