नाना पटोलेंनी आपल्याच मंत्र्याला आणले अडचणीत; फडणावीसांना दिला पाठींबा

या प्रश्नावर समाधनकारक उत्तर न मिळाल्याने लक्षवेधी राखून ठेवण्याची मागणी केली, आणि त्याला पाठिंबा दिला नाना पटोले यांनी.
नाना पटोलेंनी आपल्याच मंत्र्याला आणले अडचणीत; फडणावीसांना दिला पाठींबा
नाना पटोलेंनी आपल्याच मंत्र्याला आणले अडचणीत; फडणावीसांना दिला पाठींबाSaam Tv

मुंबई : विधानसभेत आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बाजू घेतली आहे. आज विधान सभेत राज्यातील वीज कनेक्शन तोडली जातात याची लक्षवेधी होती. यावेळी विरोधी पक्षांनी नितीन राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी ही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना प्रश्न विचारून अडचणीत आणले.

नाना पटोलेंनी आपल्याच मंत्र्याला आणले अडचणीत; फडणावीसांना दिला पाठींबा
"मोदींची नक्कल का केली? तात्काळ माफी मागा..." हिवाळी अधिवेशनात फडणवीस तापले!

या प्रश्नावर समाधनकारक उत्तर न मिळाल्याने लक्षवेधी राखून ठेवण्याची मागणी केली, आणि त्याला पाठिंबा दिला नाना पटोले यांनी. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या मंत्र्याला नाना पटोले यांनी अडचणीत आणल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांना 'ऊर्जा' खात्यात विशेष रस होता. त्यामुळे आज सभागृहात संधी मिळताच नाना पटोले यांनी उर्जामंत्र्यांना अडचणीत आणल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com