Paralympics: विश्वविक्रमासह सुमित अंतिलची सुवर्ण पदकाला गवसणी; भारताची उल्लेखनीय कामगिरी
Paralympics: विश्वविक्रमासह सुमित अंतिलची सुवर्ण पदकाला गवसणी; भारताची उल्लेखनीय कामगिरीSaam Tv

Paralympics: विश्वविक्रमासह सुमित अंतिलची सुवर्ण पदकाला गवसणी; भारताची उल्लेखनीय कामगिरी

भारताची उल्लेखनीय कामगिरी

Tokyo Paralympics : गेल्या २४ तासांत भारताचे हे ७ पदक आहे, तर आजच्या दिवसामधील पाचवे पदक Medal ठरणार आहे. नेमबाज Shooter अवनी लेखराच्या Avni Lekhar सुवर्णपदकाने आज दिवसाची सुरुवात झाली होती. भारताचा India भालाफेकपटू सुमित याने पुरुषांच्या F६४ भालाफेक गटामध्ये वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या संदीप एसला चौथ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागणार आहे. पहिल्याच प्रयत्नांमध्ये ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे.

हे देखील पहा-

दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नवी केला आहे. तिसऱ्या प्रयत्नात सुमितने ६५.२७ मीटर भालाफेक केले होते. परंतु, अन्य स्पर्धकांच्या तुलनेमध्ये त्याने याही फेरीत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. त्याने पाचव्या प्रयत्नात परत ६८.५५ मीटर लांब भालाफेकून परत एकदा स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. या कामगिरीसह त्याने सुवर्णपदकही नावावर केले आहे.

योगेश्वर दत्तला आदर्शस्थानी ठेवत सुमितलाही कुस्तीपटू बनायचे होते. पण त्याला २०१५ मध्ये एका रस्ता अपघातात ट्रॅक्टर त्याच्या पायावरून गेल्यामुळे आणि त्याला एक पाय गमवावा लागला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक नवल सिंग यांच्या म्हणण्यावरून त्याने भालाफेकीला सुरूवात केली होती. २०१८ मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु, तेव्हा तो पाचव्या क्रमांकावर राहिलेला होता.

Paralympics: विश्वविक्रमासह सुमित अंतिलची सुवर्ण पदकाला गवसणी; भारताची उल्लेखनीय कामगिरी
गरिबी कमी करण्यात भारताची उल्लेखनीय कामगिरी 

त्यानंतर २०१९ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्याने रौप्यपदक जिंकून टोक्यो पॅरालिम्पिकची पात्रता निश्चित गाठली आहे. मागील २४ तासांत भारताचे हे ७ पदक, तर आजच्या दिवसामधील ५ पदक ठरले आहे. नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्णपदकाने देखील आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये Tokyo Paralympics भारतीय नेमबाज अवनी लेखरा Avani Lekhra नी सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे.

यानंतर लवकरच थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाकडून रौप्य, भालाफेक पटू देवेंद्र झाजरिया रौप्य, सुंदर सिंगकडून कांस्य पदक यावेळी पटकावण्यात आले आहे. अवनी लेखराने सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे. १० मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक कमावले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com