Tokyo Olympics: वीटभट्टी कामगाराच्या पोराची ऑलिम्पिक पर्यंत मजल !

फ्लाईंग मिल्खा सिंग यांचे हुकलेले ऑलिम्पिक पदक (Tokyo Olympics) अविनाश साबळे खेचून आणणार का ?
Tokyo Olympics: वीटभट्टी कामगाराच्या पोराची ऑलिम्पिक पर्यंत मजल !
Tokyo Olympics: वीटभट्टी कामगाराच्या पोराची ऑलिम्पिक पर्यंत मजल !विनोद जिरे
Published On

बीड: लहानपणी मुलांमधील स्वभावगुण पाहून, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. आणि अगदी हे वाक्य खरोखरं ठरलं ते बीडच्या मांडवा गावातील अविनाशच्या बाबतीत . घरून शाळेत जाताना तो धावतच जायचा आणि सर्वात अगोदर शाळेत पोहचायचा. त्याच्या धावण्याला प्रचंड वेग होता. याच त्याच्या धावण्याच्या जिद्दीने त्याला थेट ऑलम्पिक (Tokyo Olympics) पर्यंत पोहचला आहे. आता प्रतीक्षा आहे फक्त जिंकण्याची. पाहुयात यावरील एक खास रिपोर्ट...

बीड जिल्ह्यातील अविनाश मुकुंद साबळे (Avinash Sable) याची टोकियो जपान (Tokyo Japan) येथे ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आणि बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. आष्टी तालुक्यातील मांडवा या गावात जन्मलेल्या अविनाश याचे वडील वीटभट्टीवर काम करायचे. प्राथमिक पर्यंतचे शिक्षण अविनाशने मांडवा गावातच घेतले. शाळेत असताना वडिलांनी वीट भट्टीवर काम सुरु केल्याने, कुटुंबाला वीटभट्टीवर राहवे लागे. तेथून अविनाश धावतच शाळेत यायचा. नेमके हेच त्याच्या शिक्षकांनी हेरले आणि अविनाशला धावण्याच्या स्पर्धेत उतरवले. आणि काम करत अविनाशने धमाल केली. तो ज्या स्पर्धेत उतरायचा, वाऱ्यासारखा धावायचा आणि पदक जिंकायचा. 2006 मध्ये त्याने केलेल्या धावण्याच्या कामगिरीने त्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा आणि ग्रामस्थांनी सत्कार केला. तेथून पुढे अविनाशने मागे पाहिलेच नाही.ते आजपर्यंत.

Tokyo Olympics: वीटभट्टी कामगाराच्या पोराची ऑलिम्पिक पर्यंत मजल !
भारतीय क्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट! वाचा सविस्तर

अविनाशच्या ऑलम्पिक प्रवेशाने अविनाशच्या आई वडिलांना आनंद झाला आहे. मांडवा गावापासून काही अंतरावर धनगर वस्ती आहे, तिथे साबळे कुटुंब राहते. या वस्तीपर्यंत जायला चांगला रस्ता पण नाही. अशा स्थितीत अविनाशने आपले शिक्षण घेत ऑलम्पिक पर्यंत मजल मारली आहे. अविनाशने देशासाठी ऑलम्पिक मध्ये पदक घेऊन यावे. हीच आई वडिलांची अपेक्षा आहे.

मांडवा येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर अविनाशची निवड क्रीडा प्रबोधिनीला झाली. तिथे त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. घरच्या परिस्थिमुळे तो आर्मीत भरती झाला. प्रत्येक अभ्यास तो मन लावून करत असल्याने तो आर्मीतही चमकला. त्याने धावण्याच्या स्पर्धेला जवळ केले आणि आज ऑलम्पिक पर्यंत पोहचला. त्याला लहानपणापासून बंदूक आणि धावायला खूप आवडत असे. त्यामुळे तो आर्मीत भरती झाला आणि तिथेही धावू लागला.

दरम्यान अविनाशने केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल, तो ऑलम्पिक पर्यंत पोहचला आहे. आता त्याच्या पदकाची सर्वाना आशा लागली आहे. गावातील नागरिकही स्पर्धेकडे डोळे लावून आहेत. त्यामुळं फ्लाईंग मिल्खा सिंग यांचे हुकलेले ऑलिम्पिक पदक अविनाश साबळे खेचून आणणार का ? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे...विनोद जिरे साम टीव्ही बीड....!

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com