Tokyo Olympics 2020: नीरज चोप्रा देशाला पदक मिळवून देईल!

नीरज चोप्रा देशाला पदक मिळवून देईल!
Tokyo Olympics 2020: नीरज चोप्रा देशाला पदक मिळवून देईल!
Tokyo Olympics 2020: नीरज चोप्रा देशाला पदक मिळवून देईल!Saam Tv
Published On

जपान Japan येथील टोकियो Tokyo ऑलिम्पिक Olympics स्पर्धेमध्ये १०० हून अधिक खेळाडू भारताचे India प्रतिनिधीत्व यावेळी करणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या जास्त प्रमाणामध्ये भारतीय खेळाडूंचा ताफा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उतरणार आहे. यामुळे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदरामध्ये काही पदक पडणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रबळ भालाफेक नीरज चोप्राचे Neeraj Chopra नाव सध्या आघाडीवर आहे. Tokyo Olympics Neeraj Chopra Medaldvj97

हे देखील पहा-

तो भालाफेक खेळामध्ये देशाला अनेक पदकाची कमाई करुन देणार असे वाटत आहे. त्याच्या या कामगिरीवर जर नजर टाकली तर तो अपेक्षा सहज सांभाळेल असे दिसून येत आहे. २०१६ मधील ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप Championship स्पर्धेमध्ये नीरजने अतिशय लक्षवेधी कामगिरी केली होती. वीशीच्या अगोदरच त्याने ८४.४८ मीटर भाला फेकले होते. ज्यूनिअर वर्गवारीमध्ये त्याचा हा मोठा विश्वविक्रम आज देखील अबाधित राहिला आहे.

यामुळेच त्याच्याकडून पदकाची अशा लागून राहिली आहे. त्याने हा विश्वविक्रम रिओ Rio ऑलिम्पिक कॉलिफिकेशनच्या शेवटच्या दिवशी घेतला होता. पण तो त्याचवेळी ऑलिम्पिकसाठी पात्र मात्र ठरला नव्हता. या लक्षवेधी कामगिरीवर इंडियन आर्मीने नीराजला नायब सुभेदार पदावर नियुक्ती केली आहे. या सन्मानमुळे नीरजच्या कामगिरीमध्ये सातत्याने सुधारणा झाल्याचे बघायला मिळाले आहे. Tokyo Olympics Neeraj Chopra Medaldvj97

Tokyo Olympics 2020: नीरज चोप्रा देशाला पदक मिळवून देईल!
नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देणार- हेमंत पाटील

२०१८ मध्ये त्यान आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये गोल्डन Golden कामगिरीची केली आहे. नीरजने आंतरराष्ट्रीय लेवलवर नेहमी सर्वोत्तम कामगिरी करताना दिसून आला आहे. २०१८ मध्ये जकार्ता आशियाई गेम्स व गोल्ड कोस्ट, २०१७ मध्ये आशियाई चॅम्पियनशिप, तर २०१६ मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०१६ मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण कामगिरी केली होती. २०१६ मधील ज्यूनिअर आशियाई चॅम्पियनशिप मध्ये रौप्यसह मोठं- मोठ्या स्पर्धेत देशाकरिता ६ पदके जिंकली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com