Tokyo Olympics: रॅकिंग राऊंडमध्ये दिपीका कुमारी 9 व्या क्रमांकावर

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीचे (Deepika Kumari) टोकियोमध्ये (Tokyo Olympics) चांगले पदार्पण झालेले नाही.
Tokyo Olympics: रॅकिंग राऊंडमध्ये दिपीका कुमारी 9 व्या क्रमांकावर
Tokyo Olympics: रॅकिंग राऊंडमध्ये दिपीका कुमारी 9 व्या क्रमांकावरTwiitter/ @worldarchery
Published On

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीचे (Deepika Kumari) टोकियोमध्ये चांगले पदार्पण झालेले नाही. दीपिका कुमारी रॅकिंग राऊंडमध्ये नवव्या क्रमांकावर राहिली आहे. आता मुख्य स्पर्धेच्या पुर्वी पहिल्या फेरीत त्यांना सोपा प्रतिस्पर्धी मिळाला होता. युमेनोशिमा पार्क येथे झालेल्या सामन्यात जगातील अव्वल क्रमांकाची तिरंदाज दीपिकाने ६६३ स्कोर केला ज्यात पहिल्या हाफमध्ये ३३४ तर आणि दुसऱ्या हाफमध्ये ३२९ स्कोर केला. तिने ७२ निशाण्यांपैकी ३० वेळा १० गुण मिळवले.

दीपिकाचा सामना आता जागतिक क्रमवारीत १९३ व्या क्रमांकावर असलेली भूतानची तिरंदाज कर्माशी सामना होईल. जी रँकिंगच्या फेरीत 56 व्या स्थानावर आहे. पहिल्या तीन स्थानावर कोरियन तिरंदाजांचे वर्चस्व राहिले. कोरियाच्या २० वर्षीय अ‍ॅन सॅन ६८० च्या गुणांसह अव्वल स्थानावर आहे, जो ऑलिम्पिकचा विक्रम आहे. यापूर्वी ऑलिम्पिकचा रेकॉर्ड ७६३ होता, तर जागतिक विक्रम ६९२ आहे. जो कंग ची वोंगच्या नावावर आहे, उपांत्यपूर्व फेरीत दीपिका एन सॅनशी स्पर्धा करू शकते.

Tokyo Olympics: रॅकिंग राऊंडमध्ये दिपीका कुमारी 9 व्या क्रमांकावर
पाकिस्तानला भारताचा 'ब' संघही हरवू शकतो; दानिश कनेरियाची भविष्यावाणी

टोक्यो टेस्ट टूर्नामेंट २०१९ मध्ये दीपिकाला पराभूत करणारी सॅनने ३६ वेळा १० गुण घेतले. झांग मिंनही ६७७ गुणांसह दुसऱ्या आणि कांग ची वोंग ६७५ गुणांसह तिसर्‍या स्थानी राहिल्या. २७ जुलै रोजी एलिमिनेशन फेरीचे सामने खेळले जातील. या क्रमवारीनूसार एलिमिनेशन फेरी आणि प्रतिस्पर्ध्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. तिरंदाजांना ७० मीटरच्या अंतरावरुन ७२ बाण दिले जातात. ६-६ बाणांच्या १२ सिरिज दिल्या जातात. दुसरीकडे कोरियाच्या अॅन सॅनने ६८० गुण मिळवत ऑलिम्पिकमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे. ऐन सॅनने १९७६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये ६७३ गुण मिळवणाऱ्या लेना हर्सेमेंकोचा विक्रम मोडला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com