Sports News: विम्बल्डनसाठी रशियन खेळाडूंवर बंदी?

युक्रेनवरील रशियाचे आक्रमण आणि बेलारूसने युद्धाला दिलेला पाठिंबा याला प्रत्युत्तर म्हणून, विम्बल्डन या स्पर्धेचे आयोजक रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना २७ जूनपासून येथे सुरू होणाऱ्या ‘ग्रँड स्लॅम’ टेनिस स्पर्धेतून बंदी घालण्याची योजना आखत आहे
Sports News: विम्बल्डनसाठी रशियन खेळाडूंवर बंदी?
Published On


लंडन : युक्रेनवरील रशियाचे आक्रमण आणि बेलारूसने युद्धाला दिलेला पाठिंबा याला प्रत्युत्तर म्हणून, विम्बल्डन या स्पर्धेचे आयोजक रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना २७ जूनपासून येथे सुरू होणाऱ्या ‘ग्रँड स्लॅम’ टेनिस स्पर्धेतून बंदी घालण्याची योजना आखत आहे. (Tennis News Russia May be Banned From Wimbledon)

रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) आक्रमण करून मानवी हक्कांची पायमल्ली केल्यानंतर जगभर त्यांच्याविरोधात बंदीचा सुर आहे. विम्बल्डनच्या (Wimbledon Tennis) या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॅनिल मेदवेदेववर होणार आहे. या निर्णयामुळे मेदवेदेवचे हंगामातील तिसऱ्या ‘ग्रँड स्लॅम’मध्ये खेळण्याचे (Sports) स्वप्न भंगले जाऊ शकते.

Sports News: विम्बल्डनसाठी रशियन खेळाडूंवर बंदी?
गुटख्याच्या जाहिरातीतून अक्षय कुमारची माघार; फॅन्सच्या नाराजीनंतर मागितली माफी

या वर्षाच्या सुरवातीला काही काळ एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झालेल्या मेदवेदेवसह अव्वल १०० मध्ये आणखी तीन रशियन पुरुष टेनिसपटू आहे ज्यांना या निर्णयामुळे धक्का बसून शकतो. त्यामध्ये आंद्रे रुबलेव्ह (क्रमांक ८), कॅरेन खाचानोव्ह (क्रमांक २६), आणि अस्लन करातसेव्ह (क्रमांक ३०) यांचा सामावेश आहे.

तर दुसरीकडे, महिलांत १५व्या क्रमांकावर असलेल्या अनास्तासिया पावल्युचेन्कोवा आणि २६व्या क्रमांकावर असलेल्या डारिया कासात्किनासह एकूण आठ खेळाडू आहेत ज्यांना या निर्णयाचा फटका बसू शकतो. रशियासह बेलारूसच्याही खेळाडूंवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, बेलारूसची दोन वेळा ‘ग्रँड स्लॅम’ विजेती व्हिक्टोरिया अझारेन्का, चौथ्या क्रमांकावरील आर्यना सबालेन्का आणि १८ क्रमांकावरील व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यासह इतर काही उच्च-क्रमांकित महिला बेलारूसियन खेळाडूंना या निर्णयामुळे फटका बसू शकतो.

फेब्रुवारीमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून, रशियन आणि बेलारशियन खेळाडूंना एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरमध्ये आपल्या राष्ट्रीय ध्वजाशिवाय सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर, डेव्हिस करंडक आणि बिली जीन किंग करंडकाच्या सांघिक स्पर्धांमध्ये रशियन खेळाडूंना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

‘‘रशियाचा ध्वज फडकावणाऱ्या कोणत्याही खेळाडूला खेळण्याची परावानगी देऊ नये तसेच, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून व्लादिमीर पुतिन यांचा निषेध करणारे पत्र लिहून घेतल्यानंतरच त्यांना खेळण्याची परवानगी द्यावी.’’ असे, ब्रिटनचे क्रीडा मंत्री निगेल हडलस्टन यांनी मार्चमध्ये म्हटले होते. त्यानंतर त्यांनी विम्बल्डन आयोजकांशी यासंबंधीत चर्चा केल्याचीही माहिती आहे. यापूर्वी, रशियाच्या फुटबॉल संघालाही कतार विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत खेळण्यापासून फिफाकडून बंदी घालण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com