पाकिस्तानने (Pakistan T-20 Squad) टी -20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. याशिवाय तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे. माजी कर्णधार सरफराज अहमद आणि शोएब मलिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही. सरफराजपेक्षा आझम खानला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा टी 20 वर्ल्डसाठी निवडलेला संघ या दोन्ही मालिकांमध्ये खेळताना दिसेल.
सरफराजला न घेण्याबाबत, निवडकर्ता मोहम्मद वसीम म्हणाले, “आम्ही संघात सर्वोत्तम पर्याय समाविष्ट केला आहे. मधल्या फळीत उत्तम फलंदाज असलेल्या यष्टीरक्षकाचा समावेश करण्यात आला आहे. आझम खान संघात निवड ही सार्थ आहे. यावर्षी टी 20 विश्वचषक ओमान आणि यूएईमध्ये 17 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा विचार केला तर निवड उद्या होणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेवून निवड समिती 2 ते 5 खेळाडूं जास्त निवडू शकते. आता भारतीय संघात नक्की कोणाला स्थान मिळेल हे उद्याच कळेल.
पीसीबीचे संभाव्य अध्यक्ष रमीज राजा यांचा पाकिस्तानच्या टी -20 विश्वचषक संघावर प्रभाव दिसून येतो. रमीज आपल्या यूट्यूब चॅनेलवर सोहेब मकसूद, आसिफ अली, खुशदील शाह आणि आझम खान यांची अनेक वेळा स्तुती करताना दिसला आहे. ते जुन्या खेळाडूंच्या बाजूने नव्हते. रमीज अनेक वेळा म्हणाला आहे की टी 20 हा तरुणांचा खेळ आहे. असे मानले जाते की या कारणामुळे शोएब मलिक आणि वहाब रियाज यांची निवड झाली नाही.
भारताचा १५ सदस्यीय संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, असिफ अली, आजम खान, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदिल शहा, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, शाहीन शाह आफ्रिदी, सोहेब मकसूद.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.