IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली समोर संघ निवडीबाबत चिंता

टी -20 विश्वचषकात (T-20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली समोर संघ निवडीबाबत चिंता
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली समोर संघ निवडीबाबत चिंताTwitter/ @BCCI

टी -20 विश्वचषकात (T-20 World Cup) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. हा सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर (Dubai International Cricket Stadium) खेळला जाणार आहे. पण त्याआधी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) प्लेइंग कॉम्बिनेशनबाबत काही मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दोन सराव सामन्यात पराभूत केल्यानंतर कर्णधार कोहलीला आपल्या प्लेईंग ११ बाबत चिंता सतावत आहे. पण तरीही ३ स्थानांबाबत साशंकता असेल. हे क्रमांक आहेत 4, 7 आणि 8 आहेत. तसेच हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनाही संघात स्थान मिळणे कठीण आहे.

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली समोर संघ निवडीबाबत चिंता
समीर वानखेडेंची बॉलिवूड अभिनेत्यांकडून मालदीवमध्ये वसूली; मलिकांचा गंभीर आरोप

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी सूर्यकुमार यादव भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील पहिल्या नावांपैकी एक होता, परंतु यूएईमध्ये त्याचा फॉर्म घसरला आहे. तो संथ खेळपट्टीवर खेळण्यासाठी झुंज देत आहे. स्वस्तात विकेट गमावत आहे. त्याने पहिल्या सराव सामन्यात 8 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 38 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवचा फॉर्म उतरला आहे, ज्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा येण्याची शक्यता आहे. टी -20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या नंबर 4 म्हणून निवड झालेल्या मुंबई इंडियन्सचा सुर्यकुमारचा फार्म गेल्या तीन महिन्यांत कोसळला आहे. दोन्ही सराव सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला त्याचा फॉर्म पुन्हा मिळवण्याची सुवर्णसंधी होती, पण तो त्यात अपयशी ठरला. 31 वर्षीय सूर्यकुमारने पहिल्या सराव सामन्यात अवघ्या 8 धावा केल्या आणि शॉर्ट बॉलविरुद्ध त्याची कमजोरी पुन्हा एकदा समोर आली.

इशान किशन:

दुसरीकडे, इशान किशनने आयपीएलच्या शेवटी सलग तीन अर्धशतके झळकावून विराट कोहलीसमोर प्रश्न उपस्थित केला आहे की जर तो 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो तर चौथ्या क्रमांकावर कोण उतरेल? ईशानने पहिल्या सराव सामन्यात 46 चेंडूत 70 धावा केल्या, दुसऱ्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

हार्दिक आणि शार्दुल ठाकूर पैकी एकाला मिळू शकते संघात संधी

प्लेइंग -11 मध्ये हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यापैकी एकाची निवड केली जाणार आहे. जो 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करेल. दोन सराव सामन्यांनंतर, कर्णधार विराट कोहलीला प्लेइंग -11 मध्ये 3 फिरकी गोलंदाज आणि 2 वेगवान गोलंदाज हवेत. असे झाल्यास, कोहली अष्टपैलू शार्दुलला प्लेइंग 11 मध्ये तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून संधी देऊ शकतो. गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्यात संतुलन राखण्यासाठी. याचे मोठे कारण असेही आहे की हार्दिक गोलंदाजी करत नाही, त्यामुळे त्याला फक्त फलंदाज म्हणून खेळणे धोकादायक ठरू शकते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com