
भारतीय संघ विराट कोहलीच्या (IND vs ENG) नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांदरम्यान 5 कसोटीची मालिका सुरु आहे. यातील चौथा सामना आता सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाचा फोकस हा टी-20 विश्वचषकावर (T-20 World Cup) असणार आहे. विश्वचषक 12 ऑक्टोबरपासून ओमान आणि युएईमध्ये (UAE) सुरु होणार आहे. परंतू विश्वचषकाच्या आधी युएईमध्ये आयपीएल (IPL 2021) खेळली जाणार आहे.
टी -20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची निवड 10 सप्टेंबरला होऊ शकते. कोरोनामुळे 3 खेळाडूंना राखीव ठेवण्यात येईल. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समिती संघ निवडीसाठी पूर्णपणे तयार आहे, परंतू त्यांच्यासमोर अजूनही अनेक आव्हाने आहेत. शिखर धवन आणि हार्दिक पंड्यासह 5 मोठे प्रश्न निवड समितीसमोर असणार आहेत.
शिखर धवनच्या निवडीवर प्रश्नचिन्ह?
निवड समितीसमोर सर्वात मोठा प्रश्न शिखर धवनची सलामीवीर म्हणून निवड करायची की नाही हा असणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतीय संघामध्ये चित्र स्पष्ट आहे की रोहित शर्मासोबत लोकेश राहुलच सलामी येऊ शकतो. मात्र, जर तुम्ही आयपीएलचे रेकॉर्ड पाहिले तर शिखर धवनकडे रोहितपेक्षा जास्त धावा आहेत. धवनला यूएईमध्ये खेळण्याचा खूप अनुभव आहे. अशा परिस्थितीत तिसरा (बॅकअप) सलामीवीर म्हणून शिखर धवन किंवा पृथ्वी शॉ यांची निवड करणार का याकडे पाहावं लागेल. पृथ्वी शॉ ने विजय हजारे, आयपीएल 2020 आणि नंतर श्रीलंका मालिकेत आक्रमक खेळी खेळली आहे.
हार्दिक पांड्याचा फिटनेस आणि निवड
दुसरा मोठा प्रश्न हार्दिक पंड्याच्या फिटनेस आणि त्याच्या फॉर्मबाबत असणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पांड्याचा फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये फॅार्म खराब आहे. इंग्लंडविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने केवळ 9 षटके टाकली. आयपीएल 2021 मध्येही त्याने गोलंदाजी केली नाही. अलीकडेच श्रीलंका दौऱ्यात हार्दिकने गोलंदाजी केली होती, पण तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. तसेच त्याची बॅटही शांतच होती.
वरुण चक्रवतीला संघात जागा मिळणार?
रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहल यांच्या पुनरागमनाने वरुण चक्रवर्ती तिसरा फिरकीपटू म्हणून त्याची जागा घेतील का? या प्रश्नाचे उत्तरही निवडकर्त्यांना शोधावे लागेल. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीने श्रीलंकेविरुद्ध टी -20 मध्ये पदार्पण केले. मात्र, त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. जरी त्याची निवड झाली असली तरी अनुभवामुळे त्याला जाडेजा आणि चहलशिवाय प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणे कठीण होईल.
वॅाशिंग्टन सुंदर फिटनेसबाबत मोठा प्रश्न
अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेसबाबतही मोठा प्रश्न आहे. इंग्लंड दौऱ्यात सुंदरला बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातून आधीच वगळला गेला आहे. निवडकर्त्यांसमोर आव्हान असेल की जर सुंदरची निवड झाली तर तो विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही? वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीमध्ये फिरकीपटू व्यतिरिक्त भारतीय संघाला बळ देऊ शकतो.
आयपीएलपूर्वी श्रेयस अय्यरची टी -20 संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची पहिली पसंती होती, पण आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यानंतर आणि श्रीलंका दौऱ्यानंतर सर्व काही बदलले. यामध्ये सूर्यकुमार यादवने स्वबळावर सामना जिंकून दिला होता त्यामुळे त्याला संघात स्थान मिळू शकते. सूर्यकुमारचे वैशिष्ट्य म्हणजे तो 3, 4, 5 आणि 6 क्रमांकावर कुठेही फलंदाजी करून सामना जिंकवू शकतो.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.