SRH Record News: हैदराबादने रचला इतिहास! गेल्या १६ वर्षात कोणालाच न जमलेल्या रेकॉर्डवर कोरलं नाव

SRH vs LSG, IPL 2024: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
Sunrisers hyderabad becomes the only team to 150 or more runs in less than 10 overs srh vs lsg ipl 2024 amd2000
Sunrisers hyderabad becomes the only team to 150 or more runs in less than 10 overs srh vs lsg ipl 2024 amd2000twitter

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात हैदराबादला विजयासाठी १६६ धावांचं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या वादळी खेळीच्या बळावर हैदराबादने हे आव्हान ९.४ षटकात पूर्ण केलं. दरम्यान या पाठलागासह सनरायझर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेत इतिहास रचला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपरजायंट्स संघाने १६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी केली आणि संघाला ९.४ षटकात विजय मिळवून दिला. यासह सनरायझर्स हैदराबादने १६ वर्षांचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा सर्वात जलद पाठलाग करणारा संघ ठरला आहे. यापूर्वी कुठल्याच संघाने १५० पेक्षा अधिक धावांचा १० पेक्षा कमी षटकात पाठलाग केला नव्हता.

Sunrisers hyderabad becomes the only team to 150 or more runs in less than 10 overs srh vs lsg ipl 2024 amd2000
IPL 2024, Points Table: लखनऊच्या पराभवाचा मुंबई इंडियन्सला दणका! बनला स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिलाच संघ

आयपीएल २०१० स्पर्धेत डेक्कन चार्जर्स संघाने १५५ धावांचा १२ षटकात पाठलाग केला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने १३.१ षटकात १५० धावांचा पाठलाग केला होता. त्यानंतर २००८ मध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळताना १५७ धावांचा पाठलाग अवघ्या १३.५ षटकात केला होता.

Sunrisers hyderabad becomes the only team to 150 or more runs in less than 10 overs srh vs lsg ipl 2024 amd2000
SRH vs LSG, IPL 2024: लखनऊचे मालक लाईव्ह सामन्यात केएल राहुलवर भडकले; Video तुफान व्हायरल

आयपीएल स्पर्धेत १० षटकांच्या समाप्तीनंतर सर्वात मोठी धावसंख्या उभारणारे संघ...

१६७-०(९.४ षटकात) - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (२०२४)

१५८-४ सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२०२४)

१४८- २ सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स ( २०२४)

१४१-२ मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद(२०२४)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com