Sunil Gavaskar: 'आता IPL सुरु होणार अन् हे सर्व विसरून जाणार..'मालिका गमावल्यानंतर सुनील गावसकरांची बोचरी टीका..

Sunil Gavaskar Statement: मालिकेतील पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी मोठे वक्तव्य केले आहे.
sunil gavaskar
sunil gavaskar saam tv
Published On

Ind vs Aus 3rd ODI Sunil Gavaskar: बुधवारी भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यासह भारतीय संघाला मायदेशात खेळताना २-१ ने मालिका गमवावी लागली आहे. ही आयपीएल २०२३ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी शेवटची मालिका होती.

दरम्यान या मालिकेतील पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी मोठे वक्तव्य केले आहे.

sunil gavaskar
Ind vs Aus: शेन वाॅर्नच्या 'बाॅल ऑफ द सेंच्यूरी'ला टक्कर देणारा कुलदीपचा 'ड्रीम बाॅल' पाहीलात का? - VIDEO

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकरांनी म्हटले की, ' त्यांनी जो दबाव टाकला त्यामुळे भारतीय फलंदाजांना एक धाव घेणंही काठी झालं होतं. ज्यावेळी अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी तुम्ही अशा चुका करता आणि चुकीचे शॉट खेळता. जे शॉट्स खेळायची तुम्हाला सवय नसते. ही अशी गोष्ट आहे ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आता आयपीएल सुरु होणार आहे आता ही गोष्ट मुळीच विसरायला नको. भारतीय संघाने अनेकदा या चुका केल्या आहेत. मात्र यावेळी या चुका सावरणं गरजेचं आहे. कारण यावेळी वर्ल्ड कप भारतात होणार आहे.' (Latest sports updates)

sunil gavaskar
IND VS AUS: चेन्नईच्या मैदानावर घडणार इतिहास! रोहित अन् विराटला मोठ्या विक्रमात दिग्गजाची बरोबरी करण्याची संधी..

तसेच ते पुढे म्हणाले की,' सलामी जोडी, विराट कोहली आणि केएल राहुलची भागीदारी वगळली तर इतर कुठल्याही फलंदाजांना भागीदारी करता आली नाही. रोहित शर्मा अन्नू गिलने ६५ धावा जोडल्या होत्या. तर विराट कोहली आणि राहुलने ६९ धावांची भागीदारी केली. जेव्हा तुम्ही २७० धावांचा पाठलाग करताय त्यावेळी एका तरी जोडीने ९०-१०० धावांची भागीदारी करणं गरजेचं होतं. मात्र असं काहीच झालं नाही.

sunil gavaskar
Ind vs Aus 3rd ODI: भारत - ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसह संपणार 'या' दिग्गज खेळाडूची कारकीर्द..

या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २७० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ४९.१ षटकात २४८ धावांवर संपुष्ठात आला.

विराट कोहलीची ५४ आणि हार्दिक पंड्याची ४० धावांची खेळी वगळली,तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या पराभवासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com