Sunil Gavaskar: सुनील गावसकरांचा दावा! रोहितची होणार सुट्टी तर 'हा' खेळाडू होणार वनडे संघाचा कर्णधार

माजी भारतीय क्रिकेटपटूने नेतृत्वबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
sunil gavaskar
sunil gavaskar saam tv

Sunil gavaskar on hardik pandya: कसोटी मालिका संपल्यानंतर आता वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण याच वर्षी भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा पार पडणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. त्यामुळे आपल्या शेवटच्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो भारतीय संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. असे असताना, माजी भारतीय क्रिकेटपटूने नेतृत्वबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Latest sports updates)

sunil gavaskar
IND VS AUS 4th test: हिटमॅन इज बॅक! जे गावसकर - अझहरुद्दीनलाही नाही जमलं; तेच करत हिटमॅनने रचला इतिहास

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचं म्हणणं आहे की, यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर हार्दिक पंड्याला वनडे संघाची जबाबदारी मिळू शकते.

त्यासाठी त्याला ऑस्ट्रेलियाविरुध्द होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावसकरांनी म्हटले की,'हार्दिकने गुजरात संघासाठी आणि भारतीय संघासाठी नेतृत्व करताना जी कामगिरी केली आहे त्याने मी प्रभावित झालो आहे. माझं असं म्हणणं आहे की , त्याने जर मुंबईत होणारा वनडे सामना जिकंला तर तो नक्कीच वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असेल.'

तसेच त्यांनी पुढे म्हटले की, हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील मध्यक्रमातील प्रमुख फलंदाज आहे. तो मध्य्क्रमात राहून गेमचेंजरची भूमिका पार पाडू शकतो. तो गुजरात संघासाठी खेळताना देखील जेव्हा संघाला गरज असायची तेव्हा तो वरच्या फळीत फलंदाजीला यायचा.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ..

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com