
दिग्गज कुस्तीपटू रे मिस्टोरियो सिनियर यांचे ६६ व्या वर्षी निधन झाले आहे. ते WWE गाजवाणाऱ्या रे मिस्टोरियोचे काका होते. रे मिस्टोरियो सिनियर यांचे निधन झाल्याची बातमी त्यांचा मुलगा आरोन लोपेझ यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत दिली आहे.
मिस्टोरियो यांच्या कुस्ती कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी १९७६ मध्ये प्रोफेशनल कुस्ती खेळायला सुरुवात केली. ते २००९ पर्यंत प्रोफेशन कुस्ती खेळत होते. २०२३ मध्ये ते आपल्या प्रोफेशनल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते.
मिस्टोरियो यांनी एकदा WWA वर्ल्ड ज्युनियर लाईट व्हेट चॅम्पिनयशिपचा खिताब पटकावला होता. यासह ते अनेकदा रे मिस्टोरियो ज्युनिअरसह टॅग टीम सामने खेळण्यासाठी रिंगमध्ये उतरले होते. या दोघांनी मिळून WWA टॅग टीम चॅम्पियनशिपही जिंकली होती. प्रतिस्पर्धी रेसलरला हवेत गिरक्या घेऊन चितपट करण्याची शैली आजही जगप्रसिद्ध आहे.
मिस्टोरियो यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी प्रोफेशनल रेसलिंगसह जिमही सुरु केली होती. ही जिम त्यांनी सुपर अॅस्ट्रो आणि निग्रो कासाससोबत मिळून सुरु केली होती. यादरम्यान त्यांनी मिस्टोरियो, सायकोसिस आणि कोन्ननसारख्या रेसलरला प्रशिक्षण दिलं आणि त्यांना घडवण्याचं काम केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.