Mohammad Rizwan Record: मोहम्मद रिझवानने T20I मध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये थेट रोहित शर्माशी बरोबरी

T20 World Cup 2024: Mohammad Rizwan Equalls Rohit Sharma Record: पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात मोहम्मद रिझवानने रोहित शर्माच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.
Mohammad Rizwan Record: मोहम्मद रिझवानने T20I मध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये थेट रोहित शर्माशी बरोबरी
rohit sharma, mohammad rizwanGoogle
Published On

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील २२ वा सामना पाकिस्तान आणि कॅनडा या दोन्ही संघांमध्ये पार पडला. गेल्या दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानने हा सामना जिंकून दमदार कमबॅक केलं आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत कॅनडाचा डाव २० षटकात १०६ धावांवर संपुष्ठात आणला.

पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १०७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने हे आव्हान १७.३ षटकात पूर्ण केलं. पाकिस्तानकडून धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानची बॅट चांगलीच तळपली. त्याने ५३ चेंडूंचा सामना करत ५३ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार १ गगनचुंबी षटकार खेचला. या खेळीदरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Mohammad Rizwan Record: मोहम्मद रिझवानने T20I मध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये थेट रोहित शर्माशी बरोबरी
IND vs USA,Playing XI: शिवम दुबे अन् जडेजाला डच्चू? या दोघांना मिळेल स्थान; अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

मोहम्मद रिझवानच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद

मोहम्मद रिझवानने या सामन्यात ५३ धावांची खेळी केली. यासह त्याने रोहित शर्माच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. रिजवानने सलामीवीर फलंदाज म्हणून ३० वेळेस ५० धावांचा पल्ला गाठला आहे. या रेकॉर्डमध्ये तो रोहित शर्मासोबत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

रिझवानने हा कारनामा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१ व्या सामन्यात केला आहे. तर रोहित शर्माने हा कारनामा ११८ व्या डावात करुन दाखवला होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने हा कारनामा २८ वेळेस करुन दाखवला आहे.

Mohammad Rizwan Record: मोहम्मद रिझवानने T20I मध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये थेट रोहित शर्माशी बरोबरी
IND vs USA, Weather Update: भारत- अमेरिका सामना रद्द होणार? सामन्यापूर्वी समोर आली मोठी अपडेट

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना १०६ धावा केल्या.कॅनडाकडून आरोन जॉन्सनने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने ५३ धावांची खेळी केली. तर बाबर आझमने ३३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com