SL vs SA Highlights: श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेचा दणका! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय

SA vs SL, T20 World Cup: श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने ६ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे.
SL vs SA Highlights: श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेचा दणका! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
south africa cricket teamtwitter

दक्षिण आफ्रिकेने टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला नमवत जोरदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव अवघ्या ७७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकच्या २० आणि हेनरिक क्लासेनच्या १९ धावांच्या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी विजयाची नोंद केली.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ७८ धावा करायच्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करतानाही दक्षिण आफ्रिकन फलंदाजांच्या नाकी नऊ आले. अवघ्या २७ धावांवर दक्षिण आफ्रिकेचे २ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर ट्रीस्टन स्टब्स आणि क्विंटन डी कॉकने महत्वपूर्ण खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाची वाट दाखवली.

SL vs SA Highlights: श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेचा दणका! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
IND vs PAK: 'भीती तर वाटणारच ना..', भारत- पाकिस्तान सामन्याआधीच बाबर आझम टेन्शनमध्ये

दक्षिण आफ्रिकेने १० षटकात २ गडी बाद ४७ धावा केल्या होत्या. जिंकण्यासाठी अजूनही ६० चेंडूत ३१ धावा करायच्या होत्या. नेमकं त्याचवेळी क्विंटन डी कॉक बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर ट्रीस्टन स्टब्सही बाद होऊन माघारी परतला. वानिंदू हसरंगाने या दोघांना बाद करत श्रीलंकेला दमदार कमबॅक करून दिलं. त्यानंतर डेव्हिड मिलरने मोर्चा सांभाळत दक्षिण आफ्रिकेला १७ व्या षटकात विजय मिळवून दिला.

SL vs SA Highlights: श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेचा दणका! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

ही श्रीलंकेचा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी ८७ धावा ही सर्वात कमी धावसंख्या होती. ही धावसंख्या त्यांनी २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. श्रीलंकेचा पुढील सामना ८ जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा पुढील सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com