GT vs MI Qualifier 2: शुभमनचं शतक पाहून मास्टर ब्लास्टर झाला 'इम्प्रेस'! भेट घेऊन कानात म्हणाला...

Shubman Gil Chat With Sachin Tendulkar: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
shubman gill with sachin tendulkar
shubman gill with sachin tendulkar twitter

GT VS MI, IPL 2023: भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिलने तुफानी खेळी करत शतक झळकावले. या हंगामातील हे त्याचं वैयक्तिक तिसरं शतक ठरलं आहे.

या स्पर्धेत तो जोरदार फॉर्ममध्ये आहे. ८५१ धावांचा डोंगर उभा करत त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे.

shubman gill with sachin tendulkar
MI vs GT Qualifier 2: हार्दिकने करून दाखवलं! गुजरात सलग दुसऱ्यांदा IPL फायनलमध्ये; मुंबईचा मोठा पराभव

सामन्यानंतर सचिनने घेतली शुभमनची भेट..

शुभमन गिलने या डावात ६० चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १२९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २३३ धावांचा डोंगर उभारला होता.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला अवघ्या १७१ धावा करता आल्या. शुभमन गिलच्या या मॅचविनिंग खेळीनंतर चहू बाजूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

इतकेच नव्हे तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर स्वतः त्याची भेट घेण्यासाठी मैदानात आला होता. भेट घेतल्यानंतर सचिनने गिलसोबत हात मिळवणी केली.

त्यानंतर तो त्याच्या कानात काहीतरी बोलताना देखील दिसून आला होता. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे कळु शकलेलं नाहीये. (Latest sports updates)

shubman gill with sachin tendulkar
Rohit Sharma On Loss: दारुण पराभवानंतर हिटमॅन भडकला! 'या' खेळाडूला कारणीभूत ठरवत सांगितलं पराभवाचं खरं कारण

सचिनने गिलची भेट घेताच सोशल मीडियावर मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

गुजरातचा जोरदार विजय..

या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाकडून शुभमन गिल मुंबईच्या गोलंदाजांवर चांगलाच बरसला.

त्याने या डावात ६० चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि १० षटकारांच्या साहाय्याने १२९ धावांची खेळी केली. तर युवा फलंदाज साई सुदर्शनने देखील ४३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २३३ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४३ आणि कॅमेरून ग्रीनने ३० धावांची खेळी केली .मात्र मुंबईचा संघ विजयापासून ६२ धावा दूर राहिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com