Shubman Gill first century against Zimbabwe
Shubman Gill first century against Zimbabwe saam tv

Ind Vs SL: 70 च्या सरासरीने कुटल्या 638 धावा, ऋतुराज, सौरभ त्रिपाठीला मागे टाकत 'हा' खेळाडू करणार टी ट्वेंटी पदार्पण

भारतीय क्रिकेट संघाची नववर्षीची सुरूवात श्रीलंका विरुद्धच्या मालिकेने होणार आहे. यामध्ये भारत दौऱ्यावर आलेला श्रीलंकेचा संघ तीन टी ट्वेंटी, आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
Published on

Ind Vs SL T20 Siries: भारतीय क्रिकेट संघाची नववर्षीची सुरूवात श्रीलंका विरुद्धच्या मालिकेने होणार आहे. यामध्ये भारत दौऱ्यावर आलेला श्रीलंकेचा संघ तीन टी ट्वेंटी, आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला टी ट्वेंटी सामना ३ जानेवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या टी ट्वेंटी सामन्यांसाठी विराट कोहली, रोहित शर्मा या अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. तसेच या मालिकेसाठी शुभमन गिललाही पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. (BCCI)

Shubman Gill first century against Zimbabwe
Jalna Crime : भयंकर! ट्रॅक्टरखाली चिरडून पत्नीची हत्या; नंतर रचला अपघाताचा बनाव, पतीचं क्रूर कृत्य

गेल्या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी केल्याचा फायदा शुभमन गिलला झाला आहे. त्याचा हाच धडाकेबाज फॉर्म पाहता त्याला टी ट्वेंटी सामन्यांमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. संघात ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी सारखे तडाखेबाज खेळाडूही आहेत, मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला संधी मिळणार आहे.

शुभमन गिलला संधी का मिळणार असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. कारण भारतीय संघात राहुल त्रिपाठी सारखा धडाकेबाज खेळाडू असून त्याला अद्याप संधी देण्यात आलेली नाही. परंतु शुभमन गिलचा एकदिवसीय सामन्यांमधील रेकॉर्डमुळे त्याला टी ट्वेंटी सामन्यांमध्ये संधी मिळणार आहे.

Shubman Gill first century against Zimbabwe
Supreme Court : मोदी सरकारला मोठा दिलासा; नोटबंदीबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

गतवर्षी २०२२ मध्ये शुभमन गिलने 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 90.88 च्या सरासरीने 638 धावा कुटल्या होत्या. ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 100 च्या वर होता. त्याच्या या धडाकेबाज खेळीमध्ये एक शतक आणि 4अर्धशतकांचा समावेश आहे.

गिलचे टी ट्वेंटी रेकॉर्ड

शुभमन गिलने 92 टी ट्वेंटी सामन्यांमध्ये 33.46 सरासरीने 2577 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेटही 128 पेक्षाही जास्त आहे. त्याच्या याच सातत्यपुर्ण कामगिरीमुळे त्याला टी ट्वेंटी सामन्यांमध्ये संधी मिळणार आहे. (Indian Cricket Team)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com