Cricketer Death News: 'नो बॉल'मुळे गेला जीव! मैदानातच २४ वर्षीय खेळाडूची मित्रांकडून हत्या

Shocking News: क्रिकेट खेळताना नो बॉलवरुन झालेल्या वादावरुन जिवे मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
cricket
cricketsaam tv news

Cricketer Death News:

क्रिकेट खेळताना अनेकदा बाचाबाची होण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या आणि पाहिल्याही असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे नेहमीच पाहायला मिळतं. मात्र क्रिकेट खेळताना नो बॉलवरुन झालेल्या वादावरुन जिवे मारण्याची धक्कादायक घटना ग्रेटर नोएडाममध्ये घडली आहे. २४ वर्षीय तरुणावर विटने वार करुन हत्या करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या. (Player killed during playing cricket)

एडीसीपी हृदेश कठेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू पावलेला सुमित मेरठमधील ग्रेनो वेस्टच्या साई उपवन परिसरात राहायचा. तो कॅब चालवायचा. रविवारी (४ फेब्रुवारी) तो आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर गेला होता. (Cricket news in marathi)

cricket
IND vs ENG, 2nd Test: बुमराहच्या वादळात इंग्लंडचा संघ उद्ध्वस्त! दुसऱ्या दिवस अखेर टीम इंडियाकडे १७१ धावांची आघाडी

त्यावेळी सुमित आणि विरोधी संघातील खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही गटातील खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. हा वाद विकोपाला जाऊन पोहोचला. सुमितने तिथून पळ काढला. त्याने उडी मारत नाल्याच्या त्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याचा तोल गेला आणि तो नाल्यात पडला. त्यावेळी विरोधी संघातील खेळाडूंनी त्याचावर वीटेने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृ्त्यू झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नाल्यातून शव बाहेर काढून शवविच्छेदणासाठी पाठवण्यात आलं.

cricket
Shubman Gill Statement: शतक झळकावल्यानंतर जल्लोष का केला नाही? गिलने सांगितलं खरं कारण

पाोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हल्ला झाल्यानंतर तिथे प्रचंड गर्दी होती. मात्र कोणीच त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पुढे आलं नाही. जर लोकांनी त्याला वेळीच रुग्णालयात नेलं असतं तर त्याचे प्राण वाचू शकले असते. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणं सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com