Cricketer Death News: क्रीडाविश्व हादरलं; तीन क्रिकेटपटूंचा मैदानातच खेळताना मृत्यू

Three Cricketer Dies In Cricket: क्रिकेट खेळताना दुखापत होणं सामान्य गोष्ट आहे. कधी चेंडू लागुन तर कधी डाईव्ह मारत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत असतात.
cricket
cricketsaam tv news

Cricketer Death News:

क्रिकेट खेळताना दुखापत होणं सामान्य गोष्ट आहे. कधी चेंडू लागुन तर कधी डाईव्ह मारत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत असतात. मात्र अनेकदा ही दुखापत इतकी गंभीर असते की, त्या खेळाडूला आपलं प्राण गमवावं लागतं.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत, जिथे खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान लागोपाठ ३ अशा घटना घडल्या आहेत.जिथे क्रिकेटपटूला क्रिकेट खेळताना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मुंबईच्या मैदानांवर एकाच वेळी अनेक सामने खेळले जातात. खेळपट्ट्या जवळ असल्याने चेंडू लागण्याची भीती अधिक असते. अशातच सोमवारी मुंबईतील माटुंगाच्या मैदानावर ५२ वर्षीय क्रिकेटपटूचा चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे. ५२ वर्षीय जयेश सावला आपल्या संघाकडून क्षेत्ररक्षण करत असताना दुसऱ्या खेळपट्टीवरील फलंदाजाचा चेंडू त्यांना लागला.त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

cricket
Cricketer Death News: धक्कादायक! एकाच वेळी सुरु होते २ सामने; मुंबईत क्षेत्ररक्षण करत असताना क्रिकेटपटूचा मृत्यू

दुसरी घटना नोएडा येथे घडली आहे. सध्या क्रिकेट खेळताना क्रिकेटपटूंना हृदयविकाराच्या झटका आल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे.

अशीच घटना नोएडामध्ये घडली आहे. ३२ वर्षीय विकासला क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने आपले प्राण गमवावे लागले आहे. तो दिल्लीतील रोहिणी येथे राहत होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest sports updates)

cricket
IND vs AFG 1st T20I: रोहित- विराटचं कमबॅक तर प्रमुख फलंदाज बाहेर! पहिल्या टी-२० साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

तर तिसरी घटना सिन्नरमध्ये घडली आहे. २९ वर्षीय महेश पांडुरंग बर्डे हा क्रिकेट खेळत होता. त्यावेळी त्याच्या छातीत कळ येऊन त्याचा मृत्यू झाला आहे. महेश आणि त्याचे मित्र मंगळवारी सायंकाळच्या वेळी गावाजवळ क्रिकेट खेळत होते. त्यावेळी त्याच्या छातीत दुखायला लागलं. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com