Prithviraj Patil: ऑलिंपिक स्पर्धेत देशाचे नाव उज्जवल करीन : पृथ्वीराज पाटील

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून सन्मान केला.
shivendraraje bhosale feliciated maharashtra kesari prithviraj patil in satara
shivendraraje bhosale feliciated maharashtra kesari prithviraj patil in satarasaam tv

सातारा : गुणवंतांना शाब्बासकी देत त्यांना बक्षीस अथवा देणं हे छत्रपतींच्या रक्तातच आहे. मला केलेल्या या मदतीचं मी सोनं करेन. आपल्या देशाला ऑलंपिकमध्ये (olympic) पदक मिळवून देईन असा विश्वास महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने (maharashtra kesari prithviraj patil) येथे व्यक्त केला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांच्या हस्ते पाटील याचा राेख रक्कम पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सातारी (satara) कंदी पेढ्यांचा हार घालून सन्मान करण्यात आला. त्यावेळी पृथ्वीराज पाटील (prithviraj patil) बाेलत हाेता. (maharashtra kesari prithivraj patil latest marathi news)

महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच सातारा येथे संपन्न झाली. या स्पर्धेतील विजेत्या पृथ्वीराज पाटील याने काेल्हापूरला (kolhapur) पाेहचताच संयाेजकांनी केवळ गदा दिली पारिताेषिक म्हणून राेख रक्कम द्यायला हवी हाेती अशी खंत व्यक्त केली.

shivendraraje bhosale feliciated maharashtra kesari prithviraj patil in satara
Saam Impact: तू चाल पुढं रे गड्या! Maharashtra Kesari पृथ्वीराज पाटीलवर बक्षीसांची खैरात

साम टीव्हीनं पृथ्वीराज पाटील याची खंत महाराष्ट्रातील जनतेच्या समाेर आणल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव केला. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी देखील पृथ्वीराज पाटील यास पाच लाख रुपये देऊन त्याचा सन्मान केला जाईल असे जाहीर केले हाेते. त्यानूसार आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पृथ्वीराज याचा नुकताच सन्मान करुन त्यास पाच लाख रुपयांचे पारिताेषिक दिले. त्यावेळी सातारा आणि जावळीतील ग्रामस्थ उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

shivendraraje bhosale feliciated maharashtra kesari prithviraj patil in satara
Satara: महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी घेतलेले पैसे गेले कुठं? शिवेंद्रसिंहराजे
shivendraraje bhosale feliciated maharashtra kesari prithviraj patil in satara
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com