Sarfaraj Khan: शब्बास,पठ्ठ्या! निवड समितीने डावलले, दुसऱ्याच दिवशी सर्फराजने शतक ठोकले; सेलिब्रेशनचा Video पाहाच...

सर्फराजने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना दिल्लीविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. या शतकी खेळीनंतर सर्फराजच्या खास सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Sarfaraj Khan
Sarfaraj KhanSaamtv

Ranji Trophy: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांतून सर्फराज खानला वगळण्यात आल्यानंतर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली होती. खुद्द सर्फराजनेही निवड समितीच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र निवड समितीने डावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्फराजने आपल्या बॅटने चोख उत्तर दिले आहे.

सर्फराजने रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) मुंबईकडून खेळताना दिल्लीविरुद्ध शानदार शतक झळकावले आहे. या शतकी खेळीनंतर सर्फराजच्या खास सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Sarfaraj Khan
Maharashtra Politics : शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप; ठाकरे गटाचा नेमका दावा काय?

रणजी ट्रॉफीत झळकावले शतक:

याबाबत अधिक माहिती अशी की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी सरफराज खानला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आता सरफराजने आणखी एक शतकी खेळी खेळून निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईच्या या धडाकेबाज फलंदाजाने दिल्लीविरुद्ध शानदार शतक झळकावले.

सर्फराज खानने 125 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत सरफराजने 155 चेंडूंचा सामना करत 16 चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याच्या या खेळीमुळेच मुंबई संघाला पहिल्या डावात २९३ धावा करता आल्या. मुंबई (Mumbai) संघ एका वेळी 66 धावांवर 4 विकेट गमावून संघर्ष करत होता. अशावेळी सर्फराजने हे शानदार शतक झळकावले आहे.

Sarfaraj Khan
Maharashtra Politics : शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप; ठाकरे गटाचा नेमका दावा काय?

25 वर्षीय सर्फराज खान फर्स्ट क्लास करिअरमधील केवळ 36 वा सामना खेळत आहे, पण त्याची बॅटिंग डॉन ब्रॅडमनसारखी तळपताना दिसत आहे. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, सर्फराज खानने 81.51 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत ज्यात 13 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. आकडे पाहता दोन हजारहून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त डॉन ब्रॅडमनची सरासरी सर्फराज खानपेक्षा चांगली आहे.

रणजी ट्रॉफीत जबरदस्त प्रदर्शन:

या शतकी खेळीनंतर सर्फराजने केलेले शानदार सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सर्फराज खानने रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमात आतापर्यंत धडाकेबाज खेळ दाखवला आहे. सरफराजने रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये आतापर्यंत 8 डावात 556 धावा केल्या आहेत. यादरम्यान सर्फराजची सरासरी 111.20 आहे आणि त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com