संजय मांजरेकरने केली रविंद्र जडेजाच्या खेळावर टीका

दोन फिरकी गोलंदाज संघात खेळवणे हा चर्चेचा विषय ठरला होता. जेव्हा पाऊसामुळे खेळ एक दिवस लांबला तेव्हा तरी हा निर्णय बदलायला हवा होता.
संजय मांजरेकरने केली रविंद्र जडेजाच्या खेळावर टीका
संजय मांजरेकरने केली रविंद्र जडेजाच्या खेळावर टीकाSaam Tv
Published On

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाला की, ''रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Finals) प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्थात न्यूझीलंडविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये त्याच्या फलंदाजीमुळे समावेश केला होता. परंतु तो विषेश काही करु शकला नाही. जडेजाच्या जागी हनुमा विहारीसारख्या तज्ज्ञ फलंदाजांने भारताला आणखी काही धावा जोडण्यास मदत केली असती''.

संजय मांजरेकरने केली रविंद्र जडेजाच्या खेळावर टीका
सात ICC ट्रॅाफीमध्ये 7 वेगवेगळे विजेते; जाणून घ्या सविस्तर

ऐतिहासिक सामन्यात 31 धावा (पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात 16) करणाऱ्या जडेजाला डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून निवडला गेला नव्हते असे मांजरेकर म्हणाला. एका माध्यमाशी बोलताना मांजरेकर म्हणाला, "खेळ सुरू होण्यापूर्वीच भारताचा निर्णय कसा चुकला हे लक्षात घेण्यासारखे आहे. दोन फिरकी गोलंदाज संघात खेळवणे हा चर्चेचा विषय ठरला होता. जेव्हा पाऊसामुळे खेळ एक दिवस लांबला तेव्हा तरी हा निर्णय बदलायला हवा होता''.

संजय पुढे म्हणाला ''संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी जडेजाला निवडले होते. तसेच तो डावखूऱा फिरकी गोलंदाज आहे म्हणून निवडले गेले होते. परंतु, त्याला डावखूरा फलंदाज म्हणून निवडणे याच्या कायमच मी विरोधात आहे. संघामध्ये परिस्थीती नुसार बदल करावे लागतात. जडेजाला फलंदाज म्हणून निवडणे भारतीय संघाला महागात पडले आहे''.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com