पॅरालिम्पिकमध्ये रुबिना फ्रान्सिसने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये आणखी एका पदकाची कमाई केली आहे. भारताचं नेमबाजीतील हे ४ पदक आहे. रुबिना फ्रान्सिसने 10 मीटर एअर पिस्टमध्ये आजच फायनलमध्ये धडक दिली होती. सायंकाळी ६.१५ वाजता हा फायनल सामना झाला. अंतिम फेरीत २११.१ गुणांसह ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
१० मीटर एअर पिस्टल SH 1 प्रकारात रुबिनाने कांस्य पदकाची कमाई केली. रुबिनाने पात्रता फेरीत ९०, ९०,९५, ९२, ९५९४ असे एकूण ५५६-१३x गुणांसह सहाव्या क्रमांकावर राहत अंतिम फेरी गाठली होती. शुक्रवारचा दिवस भारतासाठी खास राहिला कारण अवनी लेखराने सुवर्णपदक, मोना अगरवालने १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात कांस्य आणि मनिष नरवाल रुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात रौप्य पदक जिंकलं आहे.
रुबिना फ्रान्सिस भारतीय पॅरा-शूटर आहे. तिने नेमबाजीत पॅरा-शूटिंग प्रकारात महत्त्वपूर्ण भारतासाठी मोठं योगदान दिलं आहे. तिने पॅरा ऑलिम्पिकसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2021 मधील पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.